Sansad Ratna Award Explained: संसदरत्न पुरस्कार काय असतो? त्याचं महत्त्व किती? भारत सरकारचा काय संबंध?

श्रीकांत शिंदे, अमोल कोल्हे, सुकांत मुजुमदार, सुधीर गुप्ता, कुलदीप राय शर्मा या पाच खासदारांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Sansad Ratna
Sansad Ratna

Sansad Ratna Award Explained : श्रीकांत शिंदे, अमोल कोल्हे, सुकांत मुजुमदार, सुधीर गुप्ता, कुलदीप राय शर्मा या पाच खासदारांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार सुप्रिया सुळेंना प्रदान करण्यात आला. पण हे पुरस्कार नेमके काय आहेत? ते किती महत्वाचे आहेत? तसेच या पुरस्कारांचे निकष काय? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर याची उत्तर जाणून घेऊयात.

Sansad Ratna
Sharad Pawar : "कुणीही बारामतीतून उभं राहावं"; अजित पवारांच्या भावनिक आवाहनावर शरद पवारांचं थेट आव्हान

पुरस्काराची सुरुवात कधी आणि कोणी केली?

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून सन २०१० पासून संसदरत्न आणि संसद महारत्न पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत. चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्यावतीनं हे पुरस्कार दिले जातात. (Latest Maharashtra News)

Sansad Ratna
Maratha Reservation: "मागासवर्ग आयोगाकडून पुन्हा मराठा समाजाची फसवणूक"; आयोगाच्या माजी सदस्यांचा गंभीर आरोप

पुरस्कार किती महत्वाचा?

संसदरत्न पुरस्कार हे खासदारांना दिले जात असले तरी हे पुरस्कार सरकारतर्फे दिले जात नाहीत. तर चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्यावतीनं हे पुरस्कार दिले जातात. पण या पुरस्कारार्थी निवड समितीत संसदीय कामकाज मंत्री अध्यक्ष असतात तर सदस्यपदी इतर सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असतो. त्यामुळं या पुरस्काराला एखाद्या सरकारी पुरस्काराप्रमाणेच महत्व आहे. त्यामुळं खासदारांना आपली कामगिरी सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळते. (Marathi Tajya Batmya)

Sansad Ratna
Adhalrao Patil: म्हाडाचं अध्यक्षपद देऊन बोळवण केल्यानंतर आढळराव पाटलांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, अद्याप...

पुरस्काराचे निकष काय?

संसदेच्या कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना हे पुरस्कार दिले जातात. वर्षभराच्या काळात तिन्ही अधिवेशनांमधील खासदारांची कामगिरी कशी आहे यावरुन त्यांची निवड केली जाते. खासदारांच्या मुल्यांकनासाठी एक समिती नेमली जाते. (Latest Marathi News)

मुल्यांकनामध्ये सभागृहातील उपस्थिती, जास्तीत जास्त चर्चांमध्ये सहभाग नोंदवणे, जास्तीत जास्त प्रश्न उपस्थित करणे, सरकारनं जी विधेयकं आणली आहेत त्याव्यतिरिक्त स्वतःहून जास्तीत जास्त लोकोपयोगी खासगी विधेयकं मांडले या निकषांचा पुरस्कारासाठी विचार केला जातो. सध्या निवड समितीचे चेअरमन संसदीय कामकाजमंत्री अर्जुनराम मेघवाल हे आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीनं यंदाचे संसदरत्न निवडले आहेत.

Sansad Ratna
ISRO: इस्रोचा 'नॉटी बॉय' करणार मोठी कामगिरी; चक्रीवादळं, पावसाची मिळणार अचूक माहिती

पुरस्कार कधी दिले जातात?

  1. संसदरत्न - वर्षभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदाराला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

  2. संसद महारत्न - हा पुरस्कार दर पाच वर्षांनी दिला जातो. सातत्यानं आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांना तो दिला जातो.

Sansad Ratna
Pankaja Munde: पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत? वैद्यनाथ साखर कारखान्याला आता EPFOची नोटीस

यंदाचे संसदरत्न पुरस्काराचे मानकरी -

  1. बंगालचे भाजपध्यक्ष आणि बालूरघाट लोकसभा मतदारसंघाचे खासादर सुकांत मुजुमदार

  2. मध्य प्रदेशातील मंदसौरचे खासदार सुधीर गुप्ता

  3. कल्याणचे खासदार मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे

  4. शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे

  5. काँग्रेसचे अंदमान आणि निकोबारचे खासदार कुलदीप राय शर्मा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com