
Punjab Assembly 2022: संयुक्त समाज मोर्चाचे उमेदवार अपक्ष निवडणूक लढवणार
सध्या देशभरात पाच राज्यांची निवडणुकीवरून रणधुमाळी पाहायला मिळत आहे. या दरम्यान शेतकरी आंदोलनात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये संयुक्त समाज मोर्चा (Sanyukt Samaj Morcha) ची स्थापना केली होती आणि येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी संयुक्त मोर्चा निवडणूक लढवणार, अशी घोषणा सुध्दा करण्यात आली होती मात्र आता संयुक्त समाज मोर्चाचे उमेदवार अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा: पंजाबमध्ये कॉंग्रसेला झटका; जगमोहन कांग मुलांसह 'आप'मध्ये सामील
संयुक्त समाज मोर्चा निवडणूक लढवणार, हे ठरल्यानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणाही करण्यात आली होती. मात्र, राजकीय पक्ष म्हणून संयुक्त समाज मोर्चाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे संयुक्त समाज मोर्चाचे उमेदवार अपक्ष निवडणूक लढवणार आहे. संयुक्त समाज मोर्चातर्फे 102 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून या संदर्भात निवडणूक आयोगाशी संयुक्त समाज मोर्चानी चर्चा सुध्दा केली आहे.
Web Title: Sanyukt Samaj Morcha Will Contest Independent Elections
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..