esakal | हे वागणं बरं नव्हं : पृथ्वीराज चव्हाणांचा संरक्षणमंत्र्यांना टाेला
sakal

बोलून बातमी शोधा

हे वागणं बरं नव्हं : पृथ्वीराज चव्हाणांचा संरक्षणमंत्र्यांना टाेला

राजनाथ सिंह यांनी भाजपच्या जनसंवाद कार्यक्रमात राज्य सरकारवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युतर म्हणून आमदार चव्हाण यांनी व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिहल्ला केला.

हे वागणं बरं नव्हं : पृथ्वीराज चव्हाणांचा संरक्षणमंत्र्यांना टाेला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपले काम व जबाबदारी टाळू नये, असे आरोप करून राजनाथ सिंह अप्रत्यक्षरीत्या जबाबदारी टाळत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. कोरोनाची महामारी, चक्रीवादळाचा तडाखा आणि चीनचे अतिक्रमण असे तिहेरी संकट देशासमोर असतानाही एकत्रित येऊन मुकाबला करण्याचे त्यांना सूचत नाही, असेही आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
 
राजनाथ सिंह यांनी भाजपच्या जनसंवाद कार्यक्रमात राज्य सरकारवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युतर म्हणून आमदार चव्हाण यांनी व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिहल्ला केला. राजनाथ सिंह म्हणतात, त्याप्रमाणे सर्वोतोपरी मदत करूनही महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात येत नाही. मात्र, केंद्र सरकारने अत्यंत गंभीर स्थतीतील संकटात त्यांच्यावरील जबाबदारी झटकली आहे. लडाखमध्ये सीमेवर जो प्रकार सुरू आहे. त्याबाबत अधिकृत माहिती दिली पाहिजे. मात्र, तीही दिली जात नाही. चिनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले आहेत का, त्यांना आपण बाहेर काढू शकलो आहोत का, अतिक्रमण झाले असेल तर ते निमूटपणे सहन करतोय का, या सगळ्या खुलासाची जबाबदारी संरक्षणमंत्र्यांनी घेतली पाहिजे. मात्र, ते ती जबाबदारी सोयीस्करपणे टाळत आहेत. केंद्रातील सत्ताधारी पक्ष म्हणून असणाऱ्या जबाबदारीचे पालन केले पाहिजे. 
 
श्री. चव्हाण म्हणाले, ""राष्ट्रीय आपत्तीत कशाप्रकारे वक्तव्य केले पाहिजे. देशातील ऐक्‍य वाढविण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न करा. स्वतःची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्यामुळे दुसरीकडे कुठेतरी टीका करण्याचे साधन ते शोधत आहेत. त्यांना शोभत नाही. आज देश एका बाजूला कोरोनाच्या महामारीचा मुकाबला करतो आहे. दुसऱ्या बाजूला लडाखमध्ये भारत- चीन सीमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. त्याबाबत सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती दिली जात नाही. आताच महाराष्ट्र निसर्ग चक्रीवादळाच्या दुष्परिणामांचा सामना करतो आहे. अशा तिहेरी संकटांचा देश सामना करत असताना देशाला जोडण्याचे काम करण्याऐवजी सामान्य कार्यकर्त्यांसारखी टीव्हीवर भाजपच्या प्रवक्‍त्याने टीका करणे शोभत नाही.''

फक्त विदूषकाची कमतरता आहे - शरद पवार

पवारांनीच सर्कस असल्याचे केले मान्य ! चंद्रकांत पाटील यांची राजनाथसिंह-पवार वादात उडी

यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची झटकली गेली मरगळ