esakal | स्मशानभूमीतील व्हिडिओ व्हायरल; मनोरुग्णाच्या कृतीने खळबळ

बोलून बातमी शोधा

News

स्मशानभूमीतील व्हिडिओ व्हायरल; मनोरुग्णाच्या कृतीने खळबळ

sakal_logo
By
किरण बाेळे

फलटण शहर (जि. सातारा) : कोळकी (ता. फलटण) येथील स्मशानभूमीमध्ये चितेजवळ उभे राहून काही तरी खात असलेल्या मनोरुग्णाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यापैकी एका जळत्या चितेजवळ बसून या मनोरुग्णाने हा प्रकार केला असून, त्याला बुधवारी सायंकाळी जिंती नाका परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकारामुळे स्मशानभूमीतील व्यवस्थापनाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

सकाळी सहाच्या सुमारास या स्मशानभूमीत एक व्यक्ती चितेजवळ बसून काहीतरी करीत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिक जवळ जाऊन पहिले असता संबंधित व्यक्ती चितेतून काहीतरी काढीत असल्याचे व त्याचे तुकडे करून खात असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती नगरपालिका प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यानंतर कर्मचारी तेथे गेले असता त्याने तेथून काढता पाय घेतला. यानंतर सायंकाळच्या सुमारास या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला. नगरपालिकेचे कर्मचारी व पोलिसांनी शोधाशोध सुरू केली असता तो फलटण-पुणे रस्त्यावर जिंती नाका परिसरात आढळला. त्याला ताब्यात घेऊन रुग्णवाहिकेतून फलटण पालिकेच्या आवारात आणण्यात आले. अधिक माहिती घेता तो मनोरुग्ण असल्याचे दिसून आले. मनोरुग्णांच्या रुग्णालयात त्याची तपासणी करून पोलिस पुढील कार्यवाही करणार आहेत.

आयुष्यभर शेतीत काबाड कष्ट करून शरीराबरोबर मनानंही कणखर साथ दिली आणि मी पुन्हा..

या प्रकाराने कोळकी येथील स्मशानभूमीमधील सुरक्षितेचा प्रश्‍न चव्हाट्यावर आलेला आहे. यापूर्वीही येथील गैरसोयींमुळे ही स्मशानभूमी चर्चेत होती. या परिसरात भटक्‍या कुत्र्यांचाही मोठ्या प्रमाणात वावर असतो.

विधीसाठी ठेवलेले पदार्थ खाल्ले असावेत

संबंधित मनोरुग्ण कोळकी येथील स्मशानभूमीमध्ये चितेजवळ बसून काहीतरी खात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत होते. मात्र, तो नेमके काय होता हे स्पष्ट होत नाही. आम्ही तेथे संपूर्ण पाहणी केली असता अंत्यसंस्कारासाठी आणलेले सर्व मृतदेहांचे पूर्ण दहन झालेले होते. कोणताही मृतदेह अर्धवट जळालेला नव्हता. अनेकदा मनाई करूनही काही नातलगांकडून येथे मृत्यूनंतरचे विधी केले जातात. त्या वेळी तेथे ठेवलेले पदार्थ संबंधित मनोरुग्ण खात असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही, अशी माहिती नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव यांनी दिली.

साताऱ्यातील पश्‍चिम घाटात नव्या प्रजातींचा शोध; ठोसेघरात शोधले दोन नवे 'चतुर'

एकनाथ गायकवाड Visiting Card वरील नावासमोर 'कोंडवेकर' हा शब्द लिहायचेच!