esakal | लस घेण्यासाठी शासकीय केंद्रांवर गर्दी करु नये; आराेग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

बोलून बातमी शोधा

corona vaccine
लस घेण्यासाठी शासकीय केंद्रांवर गर्दी करु नये; आराेग्य विभागाचे नागरिकांना आवाहन
sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : येत्या एक मे पासून राज्यात सुरु हाेणा-या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरणासाठी आज (बुधवार) दुपारी चारपासून संकेतस्थळावर नाेंदणी करण्यास प्रारंभ हाेणार आहे. सातारा जिल्ह्यात सध्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याची माेहिम सुरु आहे. येत्या एक मे पासून सुरु हाेणा-या 18 ते 44 वयाेगटातील नागरिकांनी लस घेण्यासाठी शासकीय केंद्रांवर अनावश्यक गर्दी करु नये असे जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनूसार 16 जानेवारीपासून जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सरु आहे. केंद्र शासनाने एक मे पासून 18 ते 45 वयोगाटातील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यास परवानगी दिली. त्यानुसार 28 एप्रिलपासून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, या वयोगटातील लोकांनी खासगी सेंटर्सवर तेही शुल्क भरून लसीकरण करण्यास केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशात म्हटले होते. राज्य शासनाला यामध्ये सवलत देण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु, त्याचा खर्च राज्य शासनाला सोसावा लागणार होता. त्याबाबत राज्य शासनाकडूनही ठोस निर्णय न आल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम होता.

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी

बहुतांश लोक हे शासकीय रुग्णालयामध्येच लसीकरण करून घेण्याच्या तयारीत होते. परंतु, त्यांच्या आशा तुर्तास तरी मावळल्या आहेत. सातारा जिल्हा परिषदेने त्याबाबतचे धोरण स्पष्ट केले आहे. याबाबत जिल्हा परिषदेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, सद्य स्थितीत 18 ते 44 या वयोगाटातील लाभार्थींचे लसीकरण सशुल्क होणार आहे. त्यासाठी नागरिकांनी https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंकचा वापर करून नावाची नोंदणी करायची आहे. खासगी रुग्णालयामध्ये लस उपलब्ध झाल्यानंतर नोंदणी केलेल्या तारीख व वेळ ही ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

या निर्णयानुसार 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना सध्या तरी पैसे मोजूनच लस घ्यावी लागणार हे स्पष्ट झाले आहे. शासनाचा याबाबत पुढील आदेश होईपर्यंत या वयोगटतील नागरिकांनी शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी अनावश्‍यक गर्दी करून नये असे जिल्हा परिषदेने स्पष्ट करुन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आले आहे.

हेही वाचा: 18 वर्षांवरील सर्वांना लसीसाठी आजपासून नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया

कार्यकर्त्याच्या हाकेनंतर नेत्याने पाेचविले रेमडेसिव्हर