Satya Saibaba : सचिनपासून नरेंद्र मोदीपर्यंत अनेक दिग्गज होते सत्य साईबाबांचे भक्त..

सत्य साई बाबांवर अनेकांचा विश्वास होता. अनेक दिग्गज त्यांचे भक्त होते.
Satya Saibaba
Satya Saibabasakal

Satya Saibaba : शिर्डीचे साई बाबा तुम्हाला माहिती असेलच. साई बाबांचे लाखो भक्त आहेत पण साई बाबांचा अवतार मानले जाणारे सत्य साई बाबा हे तितकेच चर्चेत होते. आज त्यांची पुण्यतिथी. २४ एप्रिल २०११ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

सत्य साई बाबांवर अनेकांचा विश्वास होता. अनेक दिग्गज त्यांचे भक्त होते. भारत आणि भारताबाहेरील १०० हून अधिक देशांमध्ये त्यांचे भक्त होते. त्यामुळे ते आणखी चर्चेत होते. आज आपण त्यांच्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Satya Saibaba devotees celebrities and politicians used to follow him )

सत्य साई बाबा यांचा विविध धर्मांचे लोक आदर सत्कार करायचे. त्यांची जीवन मुल्य अनेकांसाठी प्रेरणा होते. त्यांचे विचार प्रत्येकांसाठी प्रेरणादायी होते. सामान्य माणसांपासून मोठमोठ्या दिग्गजांपर्यंत सर्वच त्यांच्या दरबारी यायचे.

माजी पंतप्रधान नरसिम्हाराव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंह, माजी राष्ट्रपति अब्दुल कलाम, अशोक सिंधल आणि आरएसएसचे सर्वच मोठे नेतेही बाबांचे भक्त होते. एवढंच काय तर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनिल गवास्कर असो की पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा बाबांना खूप मानायचे.

Satya Saibaba
Dhirendra Shastri यांच Shirdi Sai Baba यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान

सत्य साई बाबांचे काही चमत्कार प्रचंड गाजले. सत्य साई बाबा जेव्हा कोणत्याही रुग्णाला स्पर्श करायचे, त्याचा आजार दूर व्हायचा. हातात अचानक सोन्याची चैन आणून आपल्या कोणत्याही भक्ताच्या गळ्यात टाकायचे. सत्य साई बाबांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या घरातील वाद्ययंत्र अचानक वाजायला लागले होते. ते भविष्य सुद्धा अचुक सांगायचे त्यामुळे अनेक लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता, श्रद्धा होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com