

Saurav Kumar, son of a truck driver from Kathua district, Jammu and Kashmir, has been appointed as Deputy Superintendent of Police (DSP) after working at Tech Mahindra in Pune for eight years
esakal
जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते, हे जम्मू-काश्मीरमधील सौरव कुमार याने सिद्ध करून दाखवले आहे. दहावीत शिकत असताना वडिलांचे अपघाती निधन झाले. कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. आईने तीन मुलांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची जबाबदारी एकट्याने सांभाळली. अशा कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून खासगी कंपनीत आठ वर्षे नोकरी केल्यानंतर सौरवने जम्मू-काश्मीर पोलिसांमध्ये उपअधीक्षक अर्थात डीएसपी पद मिळवले आहे. त्याचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.