SBIकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात, प्रोसेसिंग फी देखील माफ; जाणून घ्या डिटेल्स 

sbi-home-loan
sbi-home-loan

भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. बँकेने व्याजदारत ७० बेसिस पॉईंट्सची (bps) सूट दिली आहे त्यामुळे एसबीआयचे व्याजदर आता ६.७० टक्क्यांपासून पुढे असणार आहेत. मात्र, ही ऑफर मर्यादीत कालावधीसाठीच असून ३१ मार्च रोजी ती संपणार आहे. 

SBIने कर्जावरील प्रोसेसिंग फी देखील पूर्णपणे माफ केली आहे. मात्र, यासाठी बँकेने काही अटी घातल्या आहेत. कर्जाची रक्कम आणि ग्राहकाचा सीबील स्कोअर किती आहे यावर या सवलतीचा फायदा मिळू शकणार आहे. त्याचबरोबर ज्या ग्राहकांचा कर्जपरतफेडीचा इतिहास चांगला आहे, अशा ग्राहकांना चांगले व्याजदर मिळू शकणार आहे. 

SBIच्या गृहकर्जावरील व्याजदर हे ग्राहकाच्या सीबील स्कोअरशी जोडलेले असतात. त्यानुसार ७५ लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्यांना ६.७० टक्के इतका व्याजदर मिळणार आहे, तर ७५ लाखांपेक्षा अधिक रकमेचं कर्ज घेतलेल्यांना ६.७५ टक्के व्याजदर मिळणार आहे, अशी माहिती बँकेच्या रिटेल बिझनेसच्या डीएमडी सलोनी नारायण यांनी सांगितले.

'मार्च-एप्रिलपर्यंत घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर होऊ शकतात कमी'

ज्या ग्राहकांना गृहकर्जाची आवश्यकता आहे ते घरबसल्या YONO अॅपच्या मार्फत अर्ज करु शकतात. या अॅपवरुन अर्ज केल्यास ग्राहकांना अधिकच्या ५ बीपीएसची सवलत मिळू शकणार आहे. तसेच आगामी महिला दिनानिमित्त महिला ग्राहकांसाठी विशेष ५ बीपीएसची सवलतही मिळणार आहे. त्याचबरोबर SBIची मान्यता असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये घर घेण्यासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना मार्च २०२१ पर्यंत प्रोसेसिंग फी देखील पूर्णपणे माफ असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com