esakal | PM मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या माजी BSF जवान तेज बहादुर यांची याचिका रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

tej bahadur pm modi

सैन्यातील निकृष्ट दर्जाच्या जेवणाची तक्रार करत व्हिडीओ व्हायरल केल्याबद्दल तेज बहादुर यांना सैन्यातून बडतर्फ करण्यात आले  होते.

PM मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या माजी BSF जवान तेज बहादुर यांची याचिका रद्द

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बीएसएफचे माजी जवान तेज बहादुर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. सुप्रीन कोर्टाकडून 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत वाराणशी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या तेज बहादुर यांचं नामांकन पत्र रद्द होण्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलोली याचिका काल मंगळवारी रद्द करण्यात आली. सैन्यातील निकृष्ट दर्जाच्या जेवणाची तक्रार करत व्हिडीओ व्हायरल केल्याबद्दल त्यांना सैन्यातून बडतर्फ करण्यात आले  होते.  

हेही वाचा - ब्रह्मोस मिसाईलचे यशस्वी परिक्षण; पाक-चीन सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचं मोठं यश

तेज बहादुर यांनी या याचिकेमध्ये आरोप केला होता की, पंतप्रधान मोदींच्या दबावाखाली चुकीच्या पद्धतीने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचं नामांकन रद्द केलं. न्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमणियनच्या पीठाने 18 नोव्हेंबर रोजी तेज बहादुर यांच्या याचिकेवर सुनावणी केली होती. 

पीठाने आज अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशालाच कायम ठेवलं. हायकोर्टाने तेज बहादुर यांचे नामांकन पत्र रद्द करण्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात दाखल याचिका रद्दबातल ठरवली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी एक मे रोजी तेज  बहादुर यांचं नामांकन स्विकारलं नव्हतं. तेज बहादुर यांनी समाजवादी पक्षाकडून नामांकन दाखल केलं होतं. हायकोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला होता. 

हेही वाचा - 5 स्टार हॉटेलमधून पार्सल मागवून शहा आदिवासी कुटुंबियांसोबत जेवले, ममता बॅनर्जींचा दावा
तेज बहादुर आपल्या एका व्हायरल व्हिडीओमुळे पहिल्यांदा चर्चेत आले होते. सैन्यदलात जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या  जेवणाबद्दल त्यांनी तक्रार केली होती. जेवणाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची आहे, असं सांगत त्यांनी एक व्हिडीओ बनवला  होता. त्यांच्या या व्हिडीओमुळे त्यांना 2017 मध्ये बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आले होते. 

loading image