टवाळखोरांच्या पाठलागामुळं स्कॉलर लेकीनं गमवाला जीव; 4 कोटींच्या शिष्यवृत्तीसह गाठली होती अमेरिका

girl killed
girl killed

अमेरिकेत उच्च शिक्षण घेणारी लेक देशातील विकृत वृत्तीची बळी ठरली आहे. कोरोनाजन्य परिस्थितीत परदेशातून मायदेशात परतलेल्या सुदीक्षा भाटी नावाच्या तरुणीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. सुदीक्षा आपल्या चुलत्यांसोबत दुचाकीवरुन नातेवाईकांच्या  घरी जात असताना बुलेटव स्वार काही तरुणांनी तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. त्यांच्यापासून वाचण्याच्या नादात सुदीक्षाच्या दुचाकीचा अपघात घडला असून यात तिचा मृत्यू झाला आहे. सुदीक्षा बसलेल्या दुचाकीला ओव्हर टेक करणे,  तिला फ्लर्ट करणे असा प्रकार बुलेटवरील तरुणांचा सुरु होता. त्यांच्या या कृत्यामुळे झालेल्या अपघातात प्रतिभावंत विद्यार्थींनीने आपला जीव गमावला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, सुदीक्षा भाटी मागील वर्षी इंटर मीडडिएटच्या परीक्षेत बुलंदशहर जनपदमध्ये अव्वल आली. त्यानंतर तिला HCL कडून 3 कोटी 80 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. शिक्षणासाठी देशातील हुशार लेकीनं अमेरिका गाठली. सुदीक्षा अमेरिकेतील  बॉब्सन महाविद्यालयात शिकत होती. तिचा सर्व खर्च सरकार करत होते. 

सुदीक्षाचे कुटुंबिया गौतमबुद्धनगरच्या दादरी परिसरात वास्तव्यास आहेत. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे ती अमेरिकेतून मायदेशी परतली होती. मामाला भेटण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात तिने जीव गमावला. काही दिवसांतच ती अमेरिकेला परतणार होती. पण टवाळखोरांच्या कृत्याची तिला मोठी किंमत मोजावी लागली. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच अज्ञात दुचाकीस्वारांच्या विरोधात तक्रार दाखल करुन त्यांचा शोध घेणं सुरु आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com