esakal | School Closed: कोरोनामुळे शैक्षणिक संस्थांवर टाळे; महाराष्ट्रासह 13 राज्यात शाळा-कॉलेज बंद

बोलून बातमी शोधा

school

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. देशात कोरोनाची लाट आल्याने राज्यांनी शैक्षणिक संस्था, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

School Closed: कोरोनामुळे शैक्षणिक संस्थांवर टाळे; महाराष्ट्रासह 13 राज्यात शाळा-कॉलेज बंद
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकांनी उपचारासाठी हॉस्पिटलसमोर रांगा लावल्या आहेत. अनेकांना बेड मिळत नाहीत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पण, तरीही कोरोनाचे थैमान थांबलेले नाही. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. शिवाय अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्याचा विचार सुरु आहे. अशात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. देशात कोरोनाची लाट आल्याने राज्यांनी शैक्षणिक संस्था, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक राज्य सरकारने कोरोनाची स्थिती लक्षात घेत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत एनसीआर स्कूल, कॉलेजसह एकूण 13 राज्यांनी शैक्षणिक संस्था बंद ठेवणार असल्याचं जाहीर केलंय.  कोरोनाचा प्रकोप संपेपर्यंत शाळा बंदच ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र सरकारने बोर्ड परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 10 वीच्या परीक्षा जूनमध्ये होतील, तर 12 वीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस ठेवण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. राज्यात कोरोना महामारीच्या प्रकोप वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय पालकांकडूनही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. 

चिंता वाढवणारी बातमी; कोरोना रुग्णसंख्येत भारत दुसरा

उत्तर प्रदेशात 1 ते 12 वी पर्यंतचे सर्व शाळा आणि कॉलेज, तसेच कोचिंग क्लासेस 30 एप्रिलपर्यंत बंद असणार आहेत. असे असले तरी बोर्ड परीक्षा निर्धारित वेळेनुसार होणार आहेत. दिल्लीमध्ये सर्व प्रायवेट स्कूल, कॉलेज पुढील आदेश येईपर्यंत बंद असतील. हिमाचल प्रदेशमध्ये शैक्षणिक संस्था 21 एप्रिलपर्यंत बंद आहेत. मध्य प्रदेशातील सर्व शाळा आणि कॉलेज 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश आहे. राज्यातील बोर्ड परीक्षाही पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. 

कोरोना महामारी : ‘सकाळ’ची भूमिका

तमिळनाडू, छत्तीसगड आणि जम्मूमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुदुचेरीमध्ये आठवीपर्यंतचे क्लास 22 मार्चपर्यंत बंद असतील. गुजरातमध्येही शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा आदेश आला आहे. बिहारमध्ये सरकारी, खासगी शाळा 18 एप्रिलपर्यंत बंद असतील. मिझोरममध्ये आठवीपर्यंतच्या शाळा बंद आहेत. राजस्थान सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार शाळा आणि कॉलेज 19 एप्रिलपर्यंत बंद असतील. हरियाणातील शाळा 30 एप्रिलपर्यंत बंद असतील.