esakal | 'असा' मिळाला भारतीय ऊसाला गोडवा; हे मिळवून देणारी शास्त्रज्ञ आहे तरी कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

scientist janaki ammal notable work in study of sugarcane

पूर्वी आपल्याला परदेशातून गोड ऊसाची आयात करावी लागत होती. त्यामुळे भारतात परतल्यानंतर जानकी यांनी कोइम्बतूरमध्ये एका संस्थेत संशोधनाचे काम सुरू केले. त्याठिकाणी ऊसाच्या विविध प्रजाती शोधण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. त्यांना यशही मिळाले.

'असा' मिळाला भारतीय ऊसाला गोडवा; हे मिळवून देणारी शास्त्रज्ञ आहे तरी कोण?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

तिरुवनंतपुरम - अमेरिकेतून वनस्पतिशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणजे डॉ. जानकी अम्मल. पदवी मिळाल्यानंतर त्या वनस्पतिशास्त्रात संशोधन करण्यासाठी संपूर्ण जग फिरल्या. मात्र, कोइम्बतूरमध्ये त्यांच्या ज्ञानाचा खरा उपयोग झाला. त्यांनी इम्पीरियल शुगरकेन या संस्थेत संशोधन सुरू केले. भारतीय ऊसाच्या जातीचा सखोल अभ्यास केला. अम्मल यांनी कोणत्या संकरामध्ये सुक्रोजचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे हे शोधण्यासाठी अनेक क्रॉस ब्रीड करून पाहिले. त्यांच्यामुळे भारतीय ऊसामध्ये गोडवा निर्माण झाला आणि भारतातील सर्व प्रकारच्या वातावरणात पिकवता येईल, अशी सुधारीत जात तयार करता आली. 

कोण आहेत जानकी अम्मल? -
जानकी अम्मल यांचं पूर्ण नाव एडावलेथ कक्कट जानकी अम्मल. त्यांचा जन्म १८९७ मध्ये केरळमधील तेलिचेरी येथे झाला. त्यांचे वडील दिवाण बहादूर एडावलेथ कक्कट कृष्णन हे मद्रास प्रेसिडेन्सीचे उपन्यायाधीश होते. त्यांनी आपल्या घरातच बाग तयार केली होती. लहानगी जानकी याच वातावरणात वाढली. त्यामुळे लहानपणीच तिच्यामध्ये झाडं, फुलं, प्राणी, पक्षी अशा समस्त जीवसृष्टीबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्यानंतर जानकीने वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले. तेलिचेरीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ती मद्रासला गेली. तेथे तिने क्वीन मेरी महाविद्यालयामधून वनस्पतिशास्त्रातली बॅचलर्स डिग्री आणि पुढे प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून ऑनर्स डिग्री प्राप्त केली. परदेशात संपूर्णपणे मोफत शिक्षण घेण्याची संधी देणारी बार्बोर शिष्यवृत्ती जानकीला मिळाली. खास आशियाई महिलांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने ही स्कॉलरशिप दिली जायची.

हेही वाचा - जागतिक गर्भनिरोधक दिवस : अनैच्छिक गर्भधारणा अन्...

अमेरिकेतून डॉक्टरेट पदवी -

जानकी १९२४ मध्ये अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात रुजू झाल्या. त्याठइकाणी प्लान्ट सायटोलॉजीचा अभ्यास सुरू केला. त्यांनी वेगवेगळ्या जातींच्या वनस्पतींचा संकर आणि एकाच कुळातल्या पण वेगळ्या पोटजातीच्या वनस्पतींचा संकर यावर प्रभुत्व मिळवले. १९३१ मध्ये त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली. 

हेही वाचा - थांबवता येऊ शकते आत्महत्या ! केवळ हवा असतो पाठीवर...

पूर्वी आपल्याला परदेशातून गोड ऊसाची आयात करावी लागत होती. त्यामुळे भारतात परतल्यानंतर जानकी यांनी कोइम्बतूरमध्ये एका संस्थेत संशोधनाचे काम सुरू केले. त्याठिकाणी ऊसाच्या विविध प्रजाती शोधण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. त्यांना यशही मिळाले. भारतातील सर्व प्रकारच्या वातावरणात पिकवता येईल अशी सुधारीत जात त्यांनी शोधून काढली ते ही अधिक गोडवा देणारी. त्यामुळे त्यांना ऊसाला गोडवा देणारी शास्त्रज्ञ म्हटले  जाते.