भीक मागून मुलाला घेतली स्कूटी! चिल्लर मोजून शोरूम कर्मचारी हैराण | Beggar women purchased Scotty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beggar Women purchased scooty for her son
भीक मागून मुलाला घेतली स्कूटी! चिल्लर मोजून शोरूम कर्मचारी हैराण | Beggar women purchased Scotty

भीक मागून मुलाला घेतली स्कूटी! चिल्लर मोजून शोरूम कर्मचारी हैराण

आईच्या प्रेमाची सर कुणालाच येत नाही असं म्हणतात. याचाच प्रत्यय देणारी घटना पश्चिम बंगालामध्ये घडली आहे. आपल्या मुलाला स्कूटी हवी आहे, म्हणून या माऊलीने भीक मागून एक एक रुपया जमा केला आणि त्याच्यासाठी स्कूटी खरेदी केली. परंतु शोरुमवाले मात्र त्यांनी दिलेले पैसे मोजून हैराण झाले.

तमिळनाडूमध्ये एका तरुणाने चिल्लर देऊन बाईक खरेदी केल्याची घटना ताजी असतानाच आता पश्चिम बंगालमध्येही एका गरीब महिलेने भीक मागून जमवलेली चिल्लर देऊन आपल्या मुलासाठी स्कूटी खरेदी केल्याची घटना समोर आली आहे. (Beggar Women purchased Scotty for her Son in West Bengal)

हेही वाचा: Video: रस्त्यावरच्या कलाकाराचा सचिन झाला फॅन; अशी दिली दाद

बाला पाडे असं या महिलेचं नाव असून तिच्या मुलाचं नाव राकेश असं आहे. नवरा नसल्यामुळे हा मुलगाच तिचं जग...राकेशला स्कूटी हवी होती, पण ती खरेदी करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. परंतु मुलाची इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून बाला व्यथित झाली. काहीही करून मुलाला स्कूटी खरेदी करायचीच असं या तिनं पक्कं ठरवल आणि चक्क भीक मागायला सुरुवात केली. भीक मागून मिळवलेला एक एक रुपया तिनं व्यवस्थित जपून ठेवला.

हेही वाचा: Photos: धोनीचा तीन फुटाचा घोडा; पाहा खास फोटो

भरपूर पैसे जमा झाल्यावर तिनं ही रक्कम आपल्या मुलाच्या हातात सोपवली. ही रक्कम कॅनमध्ये भरून राकेशने शोरुम गाठलं. एवढी चिल्लर पाहून सारेचजण चक्रावले. शोरूमने आपले कर्मचारी कामाला लावून ही रक्कम मोजून घेतली, पण ती मोजत असताना त्यांची मात्र दमछाक झाली. शेवटी आपल्या आवडीची स्कूटी घेऊन राकेश घरी परतला.

Web Title: Scooty Took A Child By Begging Chiller Mojoon Showroom Employee Harassed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Old CoinBeggarsscooter
go to top