esakal | हैदराबाद प्रकरण : चारही आरोपींचे 'इन कॅमेरा' पोस्टमॉर्टम!
sakal

बोलून बातमी शोधा

Hyderabad-Case-Autopsy

पथकाच्या मागणीनुसार त्यांना एक व्हिडिओ कॅमेरा आणि संगणक पुरवण्यात आल्याचे कुमार यांनी या वेळी सांगितले.

हैदराबाद प्रकरण : चारही आरोपींचे 'इन कॅमेरा' पोस्टमॉर्टम!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हैदराबाद : पशुवैद्यकीय तरुणीवर बलात्कार आणि हत्ये प्रकरणातील आरोपींच्या मृतदेहांवर सोमवारी (ता.23) दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यात आले. एम्सच्या न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या पथकाकडून हैदराबाद येथील एका रुग्णालयात हे शवविच्छेदन करण्यात आले. तेलंगण उच्च न्यायालयाने याबाबतचे आदेश दिले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'इन कॅमेरा' शवविच्छेदन

न्यायालयाच्या आदेशानुसार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन डॉक्‍टरांच्या पथकाकडून 'इन कॅमेरा' शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती राज्य संचालनालयाचे अधीक्षक डॉ. पी. श्रावण कुमार यांनी माध्यमांना दिली. 

- उद्याच होणार मंत्रिमंडळ विस्तार?; कोणाला मिळणार संधी

चौकशीदरम्यान पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले आरोपी आणि पोलिसांमध्ये सहा डिसेंबर रोजी झालेल्या चकमकीत हे आरोपी मारले गेले होते. त्यानंतर आरोपींच्या मृतदेहाचे पहिले शवविच्छेदन सहा डिसेंबरलाच मेहबूबनगर येथील शासकीय रुग्णालयात केले गेले. त्यानंतर मृतदेह गांधी रुग्णालयात हलविण्यात आले होते. 

- पवन राजे निंबाळकर हत्या प्रकरणाला वेगळे वळण

तसेच शवविच्छेदन करण्यापूर्वी डॉक्‍टरांच्या पथकाने आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार दुसरे शवविच्छेदन सुरू करण्यापूर्वी एम्सच्या पथकाने मृतांच्या नातेवाइकांशी संवाद साधला आणि त्यांचे निवेदन नोंदवल्याचे कुमार यांनी सांगितले.

- झारखंड निवडणूक : धोनीच्या मतदारसंघात कुणी मारली बाजी?

तसेच, पथकाच्या मागणीनुसार त्यांना एक व्हिडिओ कॅमेरा आणि संगणक पुरवण्यात आल्याचे कुमार यांनी या वेळी सांगितले.