
सुरक्षा दलाने संकरित दहशतवादी पकडला; होता पाक दहशतवाद्यांच्या संपर्कात
जम्मू-काश्मीरच्या (jammu kashmir) कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे कुलगाम पोलिस आणि ३४ राष्ट्रीय रायफल्सने दहशतवादी (terrorist) संघटना लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सांगण्यावरून खोऱ्यात कार्यरत होता. यामीन युसूफ भट (रा. गदिहामा) असे अटक केलेल्या संकरित दहशतवाद्याचे नाव आहे. (Security forces caught a hybrid terrorist)
पकडलेला ‘हायब्रीड’ दहशतवादी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित संघटनेच्या स्थानिक दहशतवाद्यांच्या (terrorist) संपर्कात होता. स्थानिक दहशतवाद्यांनी त्याच्यावर हल्ला करण्याची जबाबदारी सोपवली होती. संकरित दहशतवाद्याचे काम इतर दहशतवाद्यांना आश्रय, रसद आणि इतर मदत पुरवणे हे देखील असते. या दहशतवाद्यावर कुलगाम जिल्ह्यात साथीदारांना शस्त्रे, दारूगोळा व स्फोटक सामग्री पुरवण्यासाठी जबाबदारी होती.
यामीन युसूफ भट याच्याकडून अनेक आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा सापडला आहे. अटक केलेल्या हायब्रीड दहशतवाद्याकडून (terrorist) सुरक्षा दलांनी पिस्तूल, मॅगझिन, ५१ गोळ्या आणि दोन ग्रेनेड जप्त केले आहेत. याप्रकरणी पकडलेल्या संकरित दहशतवाद्याविरुद्ध कुलगाम (kulgam) पोलिस ठाण्यात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसही या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
पोलिसांसाठी मोठी उपलब्धी
संकरित दहशतवाद्याला (terrorist) अटक करणे ही कुलगाम पोलिसांसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. कारण, यामीन युसूफ भटला जिल्ह्याची भौगोलिक स्थिती चांगलीच ठाऊक होती. तो पीओकेच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत होता.
‘हायब्रीड’ शब्द कोणासाठी?
‘हायब्रीड’ हा शब्द अशा दहशतवाद्यांसाठी वापरला जातो ज्यांचे नाव कुठेही नाही. परंतु, ते कट्टरतावादी असतात. हे दहशतवादी हल्ला करून किंवा दहशतवाद्यांना मदत करून नियमित जीवन जगतात.