Weather Update : उष्णतेपासून मिळणार दिलासा! हवामान खात्याने वर्तवला अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Update

Weather : उष्णतेपासून मिळणार दिलासा! हवामान खात्याने वर्तवला अंदाज

भारतात सध्या प्रचंड उष्णता आहे. उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात एप्रिलमध्ये १२२ वर्षांचा विक्रम मोडला गेला. येथील सरासरी कमाल तापमान ३५.९ अंश सेल्सिअस आणि ३७.७८ अंश सेल्सिअसवर पोहोचले. अशात उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला आहे. कोणत्या राज्यांना मिळणार दिलासा हे जाणून घेऊ या...

राजधानी दिल्लीसह उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताला सोमवारपासून उष्णतेपासून (summer) दिलासा मिळू शकतो. दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पूर्व राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात ढगाळ वातावरण (Cloudy weather) असेल. येथील नागरिकांना उष्णतेची लाट आणि कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच तीन मेपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि पश्चिम राजस्थानमध्ये कमी उष्मा राहील, असा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला आहे.

एप्रिल २०१० मध्ये वायव्य भारतात सरासरी तापमान (summer) ३५.४ डिग्री सेल्सियस नोंदवले गेले. त्यापूर्वी १९७३ मध्ये ३७.७५ अंशांची नोंद झाली होती. शास्त्रज्ञांनी हवामान बदलाबाबत इशारा दिला आहे. या प्रदेशातील वाढत्या तापमानाचा एक अब्ज लोकांवर परिणाम होईल.

उष्णतेची लाट म्हणजे काय?

जेव्हा तापमान अनेक दिवस सामान्यपेक्षा जास्त राहते आणि आर्द्रता देखील वाढते तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात. मैदानी भागात जेव्हा तापमान ४० अंशांच्या वर जाते तेव्हा हवामान विभाग उष्णतेची लाट जाहीर करतो. यंदा उष्मा वाढण्याचे कारण मार्चअखेर तयार झालेले अँटी सायक्लोन असल्याचे सांगितले जात आहे. वाळवंटी भागातून उष्ण वारे येऊ लागले आहेत.