esakal | तेव्हा 'चड्ढा-नड्डा-फड्डा' इकडे दिसतात; ममता बॅनर्जींचा भाजपला चिमटा
sakal

बोलून बातमी शोधा

BJP, TMC,  jp nadda, mamata banerjee,west bengal cm

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा कवच असताना तुमच्यावर हल्ला कसा होऊ शकतो?

तेव्हा 'चड्ढा-नड्डा-फड्डा' इकडे दिसतात; ममता बॅनर्जींचा भाजपला चिमटा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

JP Nadda Convoy Attacked: पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP President JP Nadda) यांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. जेपी नड्डा यांनी या हल्ल्यानंतर अप्रत्यक्षरित्या ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. तृणमूल काँग्रेसच्या राज्यात गुंडागिरी सुरु आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा कवच असताना तुमच्यावर हल्ला कसा होऊ शकतो? तुम्ही राज्य सरकारकडून सुरक्षा घेण्याऐवजी केंद्रीय सुरक्षा दलावर विश्वास ठेवता. या हल्ल्याची योजना केली होती का? यासंदर्भातील तपास करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. 

कैलाश विजयवर्गीय, मुकुल रॉय जखमी; बुलेटप्रुफ वाहनामुळं वाचलो : जेपी नड्डा 

भाजपकडे काही काम नाही. अनेकवेळा केंद्रीय गृहमंत्री पश्चिम बंगालमध्ये असतात. जेव्हा ते नसतात तेव्हा 'चड्ढा, नड्डा, फड्डा' याठिकाणी दिसतात, अशा शब्दांत त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. भाजप नेत्यांच्या रॅलीला गर्दी होत नाही. लोक येत नाहीत. त्यामुळे ते अशाप्रकारची नौटंकी भाजपकडून केली जाते, असा आरोप ममत बॅनर्जी यांनी केलाय. पश्चिम बंगालच्या दौऱ्यादरम्यान भाजप नेत्यांच्या ताफ्याला  CRPF, BSF आणि CISF जवान तैनात आहेत, याचाही उल्लेख ममता बॅनर्जींनी केला. 

बंगालमध्ये जेपी नड्डा यांच्यावर हल्ल्याची योजना ? भाजपने गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले पत्र

भाजप कार्यकर्त्यांनी राज्यात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला आहे, असा दावा जेपी नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तृणमूल काँग्रेसने केला होता. सत्ताधारी पक्षाने राज्यात केलेले कामावरुन त्यांचे लक्ष्य हटवण्यासाठी भाजपकडून राज्यात दंगलजन्य परिस्थिती निर्माण करण्याच प्रयत्न केला जात आहे, असे सुब्रत मुखर्जी यांनी म्हटले होते. भाजप नेत्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा त्यांच्या लोकांनी केला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच्या हेतून हा प्रकार घडवून आणला आहे., असे राज्यमंत्री मुखर्जी यांनी म्हटले होते.