मंडपात वराचा हात पाहून वधूने दिला लग्नाला नकार; सर्वांना बसला धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Seeing the grooms hand, the bride refused to marry

मंडपात वराचा हात पाहून वधूने दिला लग्नाला नकार; सर्वांना बसला धक्का

उत्तर प्रदेशातील जैतपूर शहरातील विवाह गृहात विवाह पार पडत होता. जयमाला पार पडल्यानंतर वधूची मांग भरण्यासाठी वराने हात वर केला. यावेळी वधू जोरात ओरडली. वराचा हात पाहून वधूला राग आला. यानंतर वधूने लग्नास नकार दिला. हे प्रकरण पोलिस ठाण्यापासून पंचायतीपर्यंत पोहोचले. मात्र, प्रकरण निकाली निघू शकले नाही आणि वर पक्षाला वधूशिवाय परतावे लागले. (Seeing the grooms hand, the bride refused to marry)

प्राप्त माहितीनुसार, गाझियाबादच्या भुप्पुरा कुटी येथील तरुणाचे जैतपूर येथील तरुणीशी लग्न जुळले होते. जैतपूरमध्ये शनिवारी सायंकाळी विवाह सोहळा पार पडण्यास सुरुवात झाली. जयमालाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर वधू-वरांनी (groom) सात फेऱ्याही घेतल्या. यानंतर वधूची मांग भरण्याची विधी सुरू झाली. मांग भरण्यासाठी वराने कुंकू घेतले.

हेही वाचा: जितेंद्र आव्हाड म्हणतात, मंगेशकर कुटुंबीयांनी मराठी माणसाचा अपमान केला

यावेळी वधूची नजर वराच्या (groom) हातावर पडली. यावेळी तिला वराच्या एका हाताचे बोट तुटलेले दिसले. यानंतर वधूने लग्न करण्यास नकार (marriage) दिला. वधूचा हा निर्णय ऐकून दोन्ही पक्षांच्या लोकांना धक्काच बसला. वधूने अचानक लग्नास का नकार दिला, हे कोणालाच कळले नाही. वधूने (bride) कारण सांगितल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यापासून पंचायतीपर्यंत पोहोचले. मात्र, वर पक्षाला वधूशिवाय परतावे लागले.

विद्युत प्रवाहामुळे कापले वराचे बोट

विद्युत प्रवाहामुळे वराचे बोट कापले गेल्याचे वराच्या बाजूने सांगण्यात आले. समजूत घातल्यानंतरही वधूने लग्नास नकार दिला आणि वधू (bride) पक्षाने जैतपूर पोलिस ठाणे गाठले. दोन्ही बाजूंनी समेट घडवून आणण्यासाठी पंचायतीची फेरी झाली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. वधूने कोणाचेही ऐकले नाही. अखेर वराला वधूशिवायच परतावे लागले.

Web Title: Seeing The Grooms Hand The Bride Refused To Marry Uttar Pradesh Marriage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uttar Pradeshmarriage
go to top