जे मोदींचे 'खास' त्याच मोजक्या मित्रांचा 'विकास'; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 8 September 2020

या सरकारने  राष्ट्रीय संपत्ती थोडी-थोडी करुन विकायला काढली आहे. देशाच्या भविष्याला आणि विश्वासाला बेदखल करुन  LIC ला विकणे हा मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न सुरु आहे. अशा शब्दात ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी मोदी सरकारवर घणाघात केलाय. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या  'सरकारी कंपनी बेचो'  अशी मोहीम चालवत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार टिका करताना दिसते. मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून आता या सरकारने  राष्ट्रीय संपत्ती थोडी-थोडी करुन विकायला काढली आहे. देशाच्या भविष्याला आणि विश्वासाला बेदखल करुन  LIC ला विकणे हा मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न सुरु आहे. अशा शब्दात ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी मोदी सरकारवर घणाघात केलाय. 

आम्ही आमच्या हद्दीत; कांगावा करणाऱ्या चीनला भारतीय लष्काराचे चोख प्रत्युत्तर

या ट्विटसोबत राहुल गांधींनी एक बातमीचे कात्रण शेअर केले आहे. या बातमीला 'LIC चा 25 टक्के भाग विकून तिजोरी भरेल सरकार' असे शिर्षक आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सरकारी संस्थांचे खाजगीकरण करणे सुरु आहे. अनेक सरकारी संस्था तोट्यात निघाल्यामुळे त्यांचं खाजगीकरण करण्यात येत आहे. याचाच समाचार घेत आज राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा निशाणा साधला.  करत टिका केली आहे. यापूर्वी देखील ट्विटमधूनही राहुल गांधी यांनी याच मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली होती. मोदी सरकारच्या धोरणामुळे सध्याच्या परिस्थितीला देश अनेक संकटांचा सामना करत आहे. ज्यामध्ये अनावश्यक खाजगीकरण एक मोठं संकट आहे . तरूणांना नोकरी हवी आहे. परंतु, सरकार PSU (Public Sector Undertaking) चे खाजगीकरण करत असून रोजगार नष्ट करत आहे. यात फायदा कुणाचा? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला होता. जे मोदींचे खास मित्र आहेत त्यांचाच विकास मोदी सरकारने करायचे ठरवलंय, असा टोलाही राहुल गांधींनी मोदींना लगावला होता.  

'तो तर भाग आमचा' ;अरुणाचल प्रदेशातून ५ भारतीयांचे अपहरण केल्यानंतर चीनची प्रतिक्रिया


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sell PSUs Modis Campaign Rahul Gandhi Allegations