आम्ही आमच्या हद्दीत; कांगावा करणाऱ्या चीनला भारतीय लष्काराचे चोख प्रत्युत्तर

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 8 September 2020

चीनच्या दाव्यानंतर भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार,  07 सप्टेंबर 2020 रोजी चीनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत असलेल्या भारताच्या फॉरवर्ड पोझिशनच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी भारतीय सैन्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चिनी सैन्यानेच हवेत गोळीबार केला.

प्रत्यक्ष सीमा रेषा ओलांडून भारतीय सैन्याने चीनच्या दिशेने कोणत्याही प्रकारचा गोळीबार केलेला नाही, असे स्पष्टीकरण भारतीय लष्कराकडून देण्यात आले आहे.  चीनकडून खोटा कांगावा करण्यात येत असल्याचा आरोपही भारतीय लष्कराने केलाय. पूर्व लडाखमधील पँगाँग तलावाच्या दक्षिणी भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून गोळीबार करत गस्त घालणाऱ्या चिनी सैन्य धमकावण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी केला, असा दावा चीनने केला होता. हा दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. भारतीय जवानांनी आपली हद्द सोडून कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केलेले नाही. तसेच गोळाबार देखील केलेला नाही. याउलट चीनी सैन्याकडूनच काही भागात गोळीबार करण्यात आला आहे, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. 

'तो तर भाग आमचा' ;अरुणाचल प्रदेशातून ५ भारतीयांचे अपहरण केल्यानंतर चीनची प्रतिक्रिया

चीनच्या दाव्यानंतर भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार,  07 सप्टेंबर 2020 रोजी चीनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत असलेल्या भारताच्या फॉरवर्ड पोझिशनच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी भारतीय सैन्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चिनी सैन्यानेच हवेत गोळीबार केला. त्यानंतरही भारतीय सैन्याने संयम कायम ठेवला. भारतीय जवानांनी आपली परिपक्वता दाखवली, असा उल्लेखही निवेदनात करण्यात आलाय. 

भारतीय सैन्याने आमच्या हद्दीत घुसून गोळीबार केला; चीनचा दावा

सोमवारी रात्री पँगाँग तलावाच्या दक्षिणी किनाऱ्याच्या परिसरातील भारतीय जवान चीनच्या हद्दीत घुसले. त्यांनी गस्त घालणाऱ्या चिनी सैन्यावर गोळीबार केला, असा दावा चीनकडून करण्यात आला होता. हा दावा भारतीय लष्कराने खोडून काढला. चिनी सैन्यानेच हवेत गोळीबार करुन ते भारतावर आरोप करत आहेत, असे स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिले. चीनकडून सातत्याने सामंजस्य कराराचे उल्लंघन होत असल्याचेही भारतीय लष्कराने म्हटले आहे. सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरु असल्याचेही भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा सांगण्यात आले आहे. भारतीय लष्कर दोन्ही राष्ट्रांतील शांती प्रस्थापित करण्यास प्रतिबद्ध आहे. चीनने जे निवेदन जारी केले आहे ते तेथील अंतर्गत राजकारणाचा भाग असून आपल्याच जनतेची दिशाभूल करण्याचा चीन प्रयत्न करत आहे, असेही भारतीय लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India China Border Tension News India refutes Chinese claims says PLA fired a few rounds at LAC