esakal | लसनिर्मितीसाठी कटीबद्ध; केंद्राच्या खुलाशावर 'सीरम'सुद्धा सहमत
sakal

बोलून बातमी शोधा

लसनिर्मितीसाठी कटीबद्ध; केंद्राच्या खुलाशावर 'सीरम'सुद्धा सहमत

लसनिर्मितीसाठी कटीबद्ध; केंद्राच्या खुलाशावर 'सीरम'सुद्धा सहमत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : लशीची ऑर्डर न मिळाल्याचे अदर पूनावालांनी केलेले आरोप केंद्र सरकारने फेटाळून लावले होते. कोरोनाच्या लशींची नवी ऑर्डर केंद्र सरकारने दिलीच नसल्याच्या माध्यमांमध्ये आलेल्या आरोपांच्या बातम्यांना केंद्र सरकारने उत्तर दिलं होतं. या प्रकारच्या बातम्या या निराधार आहेत, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलं होतं. केंद्राच्या या खुलाशावर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रतिक्रिया दिली आहे. सीरमने ट्विट करत म्हटलंय की, आम्ही या विधानाचे आणि माहितीच्या सत्यतेचे समर्थन करतो. आम्ही गेल्या वर्षभरापासून भारत सरकारशी जवळून काम करत आहोत आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आम्ही शक्य तितक्या लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी कटीबद्ध आहोत. लशीचे उत्पादन करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.

हेही वाचा: पत्रकारही असतील कोविड वॉरियर्स; ममता बॅनर्जींची घोषणा

केंद्र सरकारने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. केंद्र सरकारने ऑर्डरच दिली नसल्याचा आरोपावर आपला बचाव करण्याचा प्रयत्न या खुलाशातून करण्यात आला होता. सीरमचे प्रमुक अदर पूनावाला हे सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांनी तिथे काही माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. त्या मुलाखतींच्या आधारावर भारतातील माध्यमांनी बातम्या दिल्या आहेत. केंद्र सरकारने सीरमकडे 10 कोटी तर भारत बायोटेककडून 2 कोटी लशींची ऑर्डर देण्यात आली होती, असं सांगितलं आहे. सरकारने या सीरमला ₹1,732.50 कोटींची रक्कम दिली आहे, ज्यामधून मे, जून आणि जुलै महिन्यात आपल्याला लस मिळतील, असं केंद्राने स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा: लशीची ऑर्डर दिली नसल्याचा अदर पूनावालांचा आरोप खोटा; केंद्राचा खुलासा

याशिवाय भारत बायोटेककडे दोन कोटींच्या लशीची ऑर्डर देण्या आली आहे. या लशी पुढच्या तीन महिन्यात येतीलच. मात्र सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडे मिळून 75 लाख लशींचे डोस शिल्लक आहेत. याशिवाय आणखी 59 लाख लशींचे डोस येत्या तीन दिवसात उपलब्ध होतील. माध्यमांतील ऑर्डर न दिल्याच्या बातम्या या पूर्णपणे खोट्या आहेत. या बातम्या वास्तवावर आधारलेल्या नसल्याचा निर्वाळा आरोग्य मंत्रालयाने एका प्रेस रिलीजद्वारे दिला आहे.

कोविशील्ड लशीच्या उत्पादनाची क्षमता ते का वाढवत नाहीत? असा सवाल पूनावालांना विचारण्यात आला असता त्यांनी म्हटलं होतं की, सरकारकडून लशीची आणखी ऑर्डर प्राप्त झालेली नाहीये. त्यामुळे वर्षाला 1 अब्ज डोसच्या वर उत्पादनाच्या वर उत्पादन करण्याची गरज कंपनीला वाटत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

loading image