लाखो रुपयांचे बक्षीस असलेला 'लव्हगुरू' अटकेत

वृत्तसंस्था
Monday, 14 September 2020

अनेक युवतींचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि नऊ जणींना फूस लावून पळवणाऱ्या कुख्यात लव्हगुरू धवल त्रिवेदी याला दिल्ली पोलिसांच्या क्राइमब्रँच आणि इंटरस्टेट सेलने बेड्या ठोकल्या.

नवी दिल्ली: अनेक युवतींचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि नऊ जणींना फूस लावून पळवणाऱ्या कुख्यात लव्हगुरू धवल त्रिवेदी याला दिल्ली पोलिसांच्या क्राइमब्रँच आणि इंटरस्टेट सेलने बेड्या ठोकल्या. हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील बद्दी येथून त्याला अटक करण्यात आली. त्रिवेदी हा पेशाने शिक्षक असून, त्याची लव्हगुरू म्हणून ओळख आहे. लव्हगुरू गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. सीबीआयने त्याच्या नावावर पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

सैराट: 'मला माफ करा, मी माझ्या पतीकडे जातेय'

सोशल मीडियावर लव्हगुरू म्हणून ओळख असलेल्या त्रिवेदी याला लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. गुजरातमधील राजकोट पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल खटल्यामध्ये त्याला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, तो नंतर पॅरोलवर सुटला होता. यानंतर २०१८ पासून तो फरार होता. मुंबई सीबीआयने त्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्रिवेदी याने अनेक महिला आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. शिवाय, नऊ महिलांना त्याने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले होते. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता. त्रिवेदीच्या शोधासाठी तपास मुंबई सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या काळात तो नाव बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहात होता. दिल्ली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे हिमाचल प्रदेशमधील बद्दी परिसरातून त्याला अटक केली. पोलिस निरीक्षक नीरज चौधरी आणि पोलिस अधिकारी संदीप लांबा यांच्या पथकाने ही कारवाई केली.

होय, चीनमधूनच कोरोनाचा प्रसार; माझ्याकडे पुरावे...

त्रिवेदी याने पोलिसांना सांगितले की, मी एक पुस्तक लिहिण्याचा विचार करत असून, त्याचे नाव '१० परफेक्ट वुमन इन माय लाइफ' असे ठेवणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: several young women kidnap nine loveguru arrested