शाहीनबाग आंदोलनात वेगळा ट्विस्ट; वकिलांनी मागितला वेळ

shaheen bagh protest supreme court statement appoints two persons for negotiation
shaheen bagh protest supreme court statement appoints two persons for negotiation

नवी दिल्ली : दिल्लीतील शाहीन बाग परिसरात सुरू असलेल्या आंदोलनात आज, नवा ट्विस्ट आलाय. आंदोलकांच्या विरोधात कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यातलीच एक याचिका सुप्रीम कोर्टातही दाखल आहे. त्यावर आज सुनावणी झाली. त्यात कोर्टानं रस्त्यावर सुरू असलेल्या आंदोलनावर चिंता व्यक्त केली आहे.

काय आहे कोर्टाचे म्हणणे?
या संदर्भात सुनावणी दरम्यान, कोर्टानं म्हटलंय की, आम्ही आंदोलनाविषयी काहीही म्हणत नाही. पण, हे आंदोलन कोठे होत आहे हे, महत्त्वाचे आहे. आमच्यासाठी रस्त्यावर आंदोलन होत आहे हा चिंतेचा विषय आहे. हेच नव्हे तर, इतर कोणत्याही आंदोलनामध्ये रस्त्यावर आंदोलन करता येणार नाही. एखाद्या दुसऱ्या प्रकरणात असाच रस्ता बंद करण्यात आला तर, गोंधळाची स्थिती निर्माण होईल. कोर्टाच्या या म्हणण्यावर, शाहीन बाग आंदोलनाच्या बाजूच्या वकिलांनी कोर्टाकडे वेळ मागितलाआहे. 

काय घडले कोर्टात?
सुप्रीम कोर्टात याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टाच्याच एका गाईडलाईन्सचा हवाला दिला आहे. 2017मध्ये कोर्टानं धरणे आंदोलनासंदर्भात एक गाईडलाईन दिली होती. पण, या गाईडलाईन्सचं उल्लंघन करण्यात आल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यावर कोर्टानं म्हटलं की, रस्त्यावर असे आंदोलन करण्याची कल्पना कोणालाही सुचू शकते. त्यामुळं आंदोलन दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणे सोयीस्कर ठरेल. असे सांगताना कोर्टानं या प्रकरणी चर्चेतून तोडगा काढण्यासाठी कोर्टानं संजय होगडे आणि साधना रामचंद्रन यांना नियुक्त केलंय. याप्रकरणाची पुढची सुनावणी पुढच्या सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com