

Sharad Pawar Warning Maharashtra Political News
esakal
Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. सरकारने जाहीर केलेल्या नव्या मुदतीत कर्जमाफीचा निर्णय झाला नाही, तर राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडण्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया देत, "तो सध्या चर्चेचा विषय नाही," असे स्पष्ट केले.