नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर काय म्हणाले, काँग्रेस नेते शशी थरूर? 

वृत्तसंस्था
Sunday, 8 December 2019

- शशी थरुर यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर केले भाष्य.

नवी दिल्ली : संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यास हा महंमद अली जीना यांच्या विचारसरणीचा महात्मा गांधी यांच्या विचारसरणीवरील विजय असेल, असे मत कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी आज व्यक्त केले. धर्माच्या आधारावर नागरिकत्व बहाल करणे म्हणजे भारताला "पाकिस्तानची हिंदुत्व आवृत्ती' बनविण्यासारखे आहे, अशी टीका थरूर यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत खासदार शशी थरूर यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर (कॅब) टीका केली. "भाजप सरकारला एका समुदायाला वेगळे पाडायचे आहे. या समुदायातील नागरिकांना कोणताही आश्रय दिला जाणार नाही. दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक मंजूर झाले तरी सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचा असा भंग होऊ देणार नाही. या विधेयकावर चर्चाही न करण्याचे सरकारचे धोरण निर्लज्जपणाचे आहे.'' 

प्रियकर आणि मुलांच्या मदतीने पत्नीनेच पतीचा केला खून

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आवश्‍यक असलेल्या कोणतीही मूलभूत प्रक्रिया न पाळता सरकार हे विधेयक आणू पाहत आहे, अशी टीकाही थरूर यांनी केली.

त्रिपुरात हैदराबादची पुनरावृत्ती; सामूहिक अत्याचार करून मुलीला जिवंत जाळले

"केंद्र सरकारचे हे धोरण म्हणजे सरळसरळ एका समुदायाला वेगळे पाडण्याचा डाव आहे. कॉंग्रेस पक्षाचाही याला निश्‍चितच विरोध असेल. पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावरच झाली होती. आता भारतालाही त्याच वाटेवर नेले जात आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना अब्दुल कलाम आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा पराभव झाल्यासारखे होईल,' असे थरूर म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shashi Tharoor slams BJP and Modi Govt over citizenship amendment bill