Shatrughn Sinha: 'येत्या काळात आणखी तमाशा होणार, पंतप्रधान...', शत्रुघ्न सिन्हांचा संताप

''सरकारने राहुल गांधींविरोधात सूडाचे राजकारण केले''
Shatrughn Sinha
Shatrughn SinhaSakal

Shatrughn Sinha: मोदी आडनाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. न्यायालयाच्या निर्णयानंतर संपूर्ण विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी हा विरोधी आघाडी भारताचा विजय असल्याचे म्हटले आहे.

रविवारी 6 ऑगस्ट, 2023 त्यांनी आरोप केला की सरकारने राहुल गांधींविरोधात सूडाचे राजकारण केले आहे. येत्या काळात संसदेत आणखी तमाशा होणार आहे.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, 'राहुल गांधी यांच्यासोबत तुम्ही सूडाचे राजकारण केले. भारत जोडो नंतर गोंधळलेल्या सरकारने राहुलजींना 24 तासांच्या आत तडकाफडकी काढून टाकले, त्यांचे सदस्यत्व रद्द केले आणि त्यांचे घर रिकामे केले. न्यायालयाच्या निर्णया नंतर लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा वाढला आहे.'

Shatrughn Sinha
Rahul Gandhi : राहुल गांधींचा लोकसभा पुनर्प्रवेश लांबणीवर?

नूह-मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान गप्प का? शत्रुघ्न सिन्हांचा प्रश्न

विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आणि संसदेत पंतप्रधानांची अनुपस्थिती यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि ते म्हणाले की, अविश्वास ठराव मांडला आहे, पण पंतप्रधान येणार की नाही, उत्तर देणार की नाही. मणिपूरवर ते गप्प का बसले आहेत.'

Shatrughn Sinha
Chanda Kochhar: चंदा कोचर यांच्यामुळे ICICI बँकेला 1,033 कोटींचे नुकसान, CBI ने दाखल केली 10 हजार पानांची चार्टशीट

शत्रुघ्न सिन्हा यांनी नूह आणि मणिपूर हिंसाचारावरही सरकारवर निशाणा साधला आणि ते म्हणाले की, जे काही घडत आहे ते अत्यंत चुकीचे आहे, अतिशय निंदनीय आहे. धोकादायक आहे.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, 'मी कोणावरही आरोप करत नाही, पण पंतप्रधान या प्रकरणी गप्प कसे आहेत, हे मला समजत नाही. एक तर ते संसदेत येत नाहीत, उत्तरे देत नाहीत. ते हरियाणा आणि मणिपूरच्या घटनांवर बोलत नाहीत किंवा कोणालाही त्यावर बोलू देत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com