Sheena Rani : ‘अग्नी-५’च्या निर्मितीतही तिचा वाटा, संशोधक शीना राणी यांच्या कार्याचे जगभर कौतुक

संशोधक शीना राणी यांनी ही कमाल केली असून त्या १९९९ पासून ‘अग्नी’ क्षेपणास्त्र प्रणालीबाबत काम करत आहेत.
Sheena Rani
Sheena Raniesakal

नवी दिल्ली : भारताने दीर्घपल्ल्याच्या ‘अग्नी-५’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर ‘मिशन दिव्यास्त्र’ची जगभर चर्चा झाली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या मोहिमेच्या यशाबद्दल ‘डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले होते. ज्या क्षेपणास्त्रामुळे आता जगभरात भारताचा दबदबा निर्माण झाला आहे त्याच्या निर्मितीमागे नारी शक्ती असल्याची बाब उघड झाली आहे. संशोधक शीना राणी यांनी ही कमाल केली असून त्या १९९९ पासून ‘अग्नी’ क्षेपणास्त्र प्रणालीबाबत काम करत आहेत.

Sheena Rani
Climatic Changes Affect Health : सर्दी-पडशाने सर्वसामान्यांचे हाल बेहाल; तापमानातील बदलाचा फटका, दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी

नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘अग्नी-५’ मध्ये ‘मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रि-एंट्री व्हेईकल’ (MIRV) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून या तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये शीना राणी (वय ५७) यांचा मोलाचा वाटा आहे. त्या आता भारताच्या संरक्षणक्षेत्रासाठी ‘दिव्यपुत्री’ ठरल्या आहेत. या क्षेपणास्त्राच्या निर्मितीचे शिवधनुष्य हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) पेलले होते.

Sheena Rani
Working women health diseases: नोकरदार महिलांमध्ये आढळतात ‘हे’ सहा प्रकारचे आजार आणि गंभीर त्रास

संस्थेमधील मोकळ्या आणि खेळीमेळीच्या वातावरणामुळे हे शक्य झाल्याचे शीना यांनी सांगितले. भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामध्ये टेस्सी थॉमस यांचे मोठे योगदान आहे, आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत शीना राणी (Sheena Rani) यांनी हे यश मिळवून दाखविले आहे. शीना राणी या त्यांच्या यशाचे श्रेय हे त्यांचे सहकारी डॉ. अविनाश चंदर आणि पती पीएसआरएस सास्त्री यांना देतात. डॉ. चंदर यांनी संकटाच्या काळामध्ये आपल्याला मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले. शीना राणी यांचे पती पीएसआरएस सास्त्री हे देखील ‘डीआरडीओ’ मध्ये संशोधक होते. त्यांच्या नेतृत्वाखालीच कौटिल्य हा उपग्रह २०१९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता.

Sheena Rani
Health Care News : ओठांवर वारंवार येतो घाम? काय असू शकतं कारण? जाणून घ्या उपाय

उच्चशिक्षित संशोधक

शीना राणी यांच्याकडे ‘डीआरडीओ’मधील ऊर्जास्रोत म्हणून पाहिले जाते. त्या ‘डीआरडीओ’च्या ‘ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स लॅबरोटरी’मध्ये प्रमुख संशोधक आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स इंजिनिअर असलेल्या शीना राणी यांनी कॉम्प्युटर सायन्सचेही उच्चशिक्षण घेतले आहे. तिरुअनंतपुरम येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी आठ वर्षे विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधील सिव्हिलियन रॉकेटरी लॅबमध्ये संशोधक म्हणून काम केले होते.

कंट्रोल सिस्टिमच्या सुकाणूधार

पोखरणमध्ये १९९८ मध्ये अणुचाचणी झाल्यानंतर शीना राणी यांची ‘डीआरडीओ’ मध्ये एंट्री झाली. अग्नी श्रेणीतील सर्वच क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाच्यावेळी ‘लाँच कंट्रोल सिस्टिम’ सांभाळण्याचे काम त्या करत होत्या. हे काम त्या १९९८ पासून करत आहेत. शीना राणी यांना काम करण्याची प्रेरणा ही माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून मिळाली. कलाम यांच्याप्रमाणेच ‘इस्रो’च्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे ‘डीआरडी’पर्यंत आला होता. ‘इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम’चेही त्यांनी काही काळ नेतृत्व केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com