...म्हणून आयटीमधील युवती करतेय जीवाचं रान

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असताना अनेकजण मदतीसाठी पुढे येताना दिसत आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली एक युवती चक्क सायकलवरून वृद्धांना मदतीसाठी सरसावली आहे. या युवतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बंगळूर: जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असताना अनेकजण मदतीसाठी पुढे येताना दिसत आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली एक युवती चक्क सायकलवरून वृद्धांना मदतीसाठी सरसावली आहे. या युवतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Coronavirus : 'कोरोना'चे थडगे बांधल्याचा चीनचा दावा

भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसमुळे संचारबंदी करण्यात आली आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाईही केली जात आहे. या अवघड परिस्थितीत एक युवती मदतीसाठी सरसावली आहे. तिचे नाव आहे ऐश्वर्या (वय ३२). ऐश्वर्या शहरामध्ये एकटे राहणाऱ्या वृद्धांच्या मदतीसाठी जीवाचं रान करीत आहे.

कोरोनाचा सर्वात जास्त धोका हा वृद्धांना आहे, त्यामुळे वृद्धांनी घराबाहेर पडू नये, असे सतत आवाहन केले जात आहे. पण, जे वृद्ध एकटे राहतात त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांना घरातील वस्तू, दूध, अन्न-धान्य आदी आवश्यक गोष्टी मिळत नाहीत. त्यांना ऐश्वर्या मदत करत आहे. यासंदर्भात तिने ट्विट करताना म्हटले आहे की, 'कोणाचे वृद्ध पालक घरात एकटे असतील, त्यांना खाण्या-पिण्याच्या पदार्थांची गरज असेल तर मला सांगा. मी दोनदा कोरोनाची चाचणी करुन घेतली आहे. मला कोरोनाची बाधा नाही. शिवाय मी वारंवार हात धुवत असते. मी सायकलवर जाऊन त्यांना गरज असलेल्या वस्तू पुरवू शकते'

ऐश्वर्या वृद्ध व्यक्तींच्या घराबाहेर जाऊन साहित्य ठेवते. तिच्या कामाच कौतुक केले जात आहे. ऐश्वर्या म्हणली, 'माझी नोकरी बंगळूरमध्ये आहे आणि आई चेन्नईमध्ये राहते. माझे काम पाहून आई  खूष आहे.'

देशात लॉकडाउन अन् जोडप्याचे मोटारीत नको ते उद्योग...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She cycles around Bengaluru offering help to senior citizens