...मग गुजरात सरकारवरही कारवाई करणार का? लेटर बॉम्बवरुन संजय राऊत यांचा भाजपला सवाल

Sanjay_20Raut17_20Aug_3.jpg
Sanjay_20Raut17_20Aug_3.jpg

नवी दिल्ली- एका अधिकाऱ्याच्या पत्रावरुन भाजप नेते राज्यसभेत, लोकसभेत आणि महाराष्ट्रात गोंधळ घालत आहेत, संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. सरकार बरखास्तीची मागणी करत आहेत. जर हाच न्याय त्यांना लावायचा असेल तर गुजरातच्या सरकारवर कारवाई करणार का ? सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि शर्मा नावाच्या आयएएस अधिकाऱ्यांनी यापेक्षा गंभीर आरोप केले होते. मग त्या सरकारवर किंवा गुजरातच्या मुख्यमंत्र्यावर कारवाई करणार का, असा रोखठोक सवाल शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केला आहे. संसदेत थयथयाट करणारे भाजप नेते गुजरात सरकारवर कारवाई करण्यासाठी गोंधळ घालणार का, असा टोला ही त्यांनी लगावला. यावेळी संजय राऊत यांनी तत्कालीन सरन्यायाधीश आणि विद्यमान राज्यसभा सदस्य तरुण गोगोई यांचा दाखल देत न्यायव्यवस्थेवरही भाष्य केले. 
 

संजय राऊत पुढे म्हणाले की, एका पोलिस अधिकाऱ्याच्या पत्रावर जर तुम्ही एखाद्या मंत्र्याचा आणि सरकारचा राजीनामा मागत असाल तर माझा गोंधळ घालणाऱ्यांना आणि पत्रकार परिषदेत आरोप करणारे कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांना प्रश्न आहे. आयपीएस संजीव भट्ट, शर्मा यांनी त्यावेळी गुजरातच्या राज्य सरकारबाबत वारंवार लेटर बॉम्ब टाकले आहेत. त्या पत्रांच्या आरोपांवरुन तुम्ही गुजरातच्या मुख्यमंत्री यांच्यावर कारवाई करणार आहात काय, असा सवाल त्यांनी केला. रवीशंकर प्रसाद हे देशाचे कायदा मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. मग मोदी हेही गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनाही असेच म्हणाल का? उलट संजीव भट्ट यांना कारागृहात टाकले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

संजीव भट यांची कागदपत्रे रवीशंकर प्रसाद यांनी समोर आणावेत. जे राज्यसभेत आणि लोकसभेत नाचत होते. त्यांनी संजीव भट्टचे यांचे पत्र समोर आणावेत आणि त्यावरुन कारवाई करावी. त्यावेळी गुजरात सरकार बरखास्त का केले नाही, असा सवाल त्यांनी केला. 

गुजरात सरकारबाबत भट्ट यांनी लिहिलेले पत्र आम्ही समोर आणले तर राज्यसभेत आणि लोकसभेत थयथयाट करणारे भाचपचे नेते पुन्हा नाचणार का?  आम्ही बँडबाजा आणू, असा टोला त्यांनी लगावला. भट यांना सेवा कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरुन निलंबित केले होते. भाजप नेते तिकडे एक न्याय आणि इथं दुसरं बोलत आहेत, आणि पत्र हा पुरावा होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणावरुन यावरुन राजकारण करु नका, नाहीतर आम्हालाही यापेक्षा वाईट राजकारण करता येते, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला. 


भारताची न्यायव्यवस्था कशाप्रकारची आहे, हे माजी सरन्यायाधीश आणि खासदार रंजन गोगोई यांनी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात कोणाला न्याय मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. सरकारी संस्था दबावात काम करत आहेत, हे मी नाही तर गोगोई सांगत आहेत. गोगोई यांना भाजपने खासदार केले आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. परमबीर सिंग यांना अशा दबावाचा उपयोग करुन काम करुन घ्यायचं आहे, तर ते जाऊ शकतात. परमबीर सिंग जर या यंत्रणेचा उपयोग करुन महाराष्ट्र सरकारवर दबाव आणू इच्छितात तर त्यांना विचार करावा लागेल, असेही त्यांनी म्हटले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com