esakal | आम्हाला राष्ट्रभक्ती कोणी शिकवू नये; संजय राऊतांचा मोदींना टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांना आमची गरज आहे. आम्ही मानवतेच्या हिताची भूमिका घेऊ. विधेयकाबाबत काही प्रश्न आहेत. सरकारने आमच्या शंकांच निरसन करावे. आम्हाला देशभक्तीचे धडे कोणाकडून घेण्याची गरज नाही. मानवतेला कोणताही धर्म नसतो.

आम्हाला राष्ट्रभक्ती कोणी शिकवू नये; संजय राऊतांचा मोदींना टोला

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राज्यसभेत आमची भूमिका वेगळी असू शकते. शिवसेना कधीच कोणाच्या दबावात येऊन काम करत नाही. आम्हाला राष्ट्रभक्ती कोणी शिकवू नये, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यात यश आले होते. पण, आज (बुधवार) हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. राज्यसभेत सरकारला इतर पक्षांची गरज पडणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे शिवसेना भाजपला राज्यसभेत मदत करेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण, महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपची साथ सोडून, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेच्या लोकसभेतील भूमिकेनंतर त्यांच्यावर टीका होत असताना राऊत यांनी राज्यसभेतील पक्षाच्या भूमिकेबाबत वक्तव्ये केले आहेत.

संजय राऊत यांचं नवं सूचक ट्विट, पाहा काय म्हणाले!

संजय राऊत म्हणाले, की राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांना आमची गरज आहे. आम्ही मानवतेच्या हिताची भूमिका घेऊ. विधेयकाबाबत काही प्रश्न आहेत. सरकारने आमच्या शंकांच निरसन करावे. आम्हाला देशभक्तीचे धडे कोणाकडून घेण्याची गरज नाही. मानवतेला कोणताही धर्म नसतो. राष्ट्रभक्ती शिकण्यासाठी कोणत्याही शाळेत शिकविली जात नाही. चर्चेनंतर आमची भूमिका स्पष्ट करू. विधेयकाबाबत आमचे काही प्रश्न आहेत. 

अखेर ठरलं! खातेवाटपावरून महाविकासआघाडीत एकमत?