

Eknath Shinde reached Delhi and held discussions with lawyers and legal experts ahead of the Supreme Court hearing on the Shiv Sena party and Bow and Arrow symbol dispute.
esakal
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर आज, 2 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. दुपारी 2 वाजल्यानंतर होणाऱ्या या सुनावणीत आता शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत शिंदे गटाची बाजू नेमकी काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.