राजधानीत शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 February 2021

शिवरायांचा गजर, पाळणा, व्याख्यान अशा उपक्रमांद्वारे राजधानी दिल्लीत आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

नवी दिल्ली - शिवरायांचा गजर, पाळणा, व्याख्यान अशा उपक्रमांद्वारे राजधानी दिल्लीत आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

मोदी यांनी शिवरायांवरील आपल्या जुन्या भाषणाचा खास व्हिडिओही ट्विटरवर पोस्ट केला. यात त्यांनी म्हटले की दुसरे शिवाजी होणे शक्‍य नसले तरी समाजात "सेवाजी'' होऊ शकतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथसिंह यांनीही शिवरायांना अभिवादन केले. संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आष्टेकर यांचे ऑनलाईन व्याख्यान
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणग्राहकतेतून व दूरदृष्टीतून स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या मावळ्यांचे संघटन निर्माण झाले. त्याचेच फळ मिळून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, असे प्रतिपादन शिवचरित्राचे अभ्यासक गणेश आष्टेकर यांनी केले. महाराष्ट्र परिचय केंद्राने त्यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले होते.

इंधन दरवाढीवर अमूलचं कार्टूनद्वारे मार्मिक भाष्य; नेटिझन्सनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

भारतमातेचे अमर सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त शतशः नमन. त्यांचे अद्भुत साहस, शौर्य, व प्रखर बुद्धिमत्ता युगानुयुगे प्रेरणा देत राहील. जय शिवाजी ! 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Maharaj birthday celebrated in the Delhi