esakal | धक्कादायक! रुग्णालयातून कोरोना प्रतिबंधक लसीचे ३२० डोस चोरीला; गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19 Vaccine

धक्कादायक! रुग्णालयातून कोरोना प्रतिबंधक लसीचे ३२० डोस चोरीला; गुन्हा दाखल

sakal_logo
By
अमित उजागरे

जयपूर : देशात सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राजस्थानातील एका रुग्णालयातून ३२० लसींचे डोस चोरीला गेले आहेत. ही बाब उघड झाल्यानंतर संबंधित रुग्णालय प्रशासनानं पोलिसांत तक्रार दिली असून याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: केंद्राला घ्यावा लागणार कठोर निर्णय; 15 दिवसांत महाराष्ट्रासह कर्नाटक, यूपीमध्येही स्फोट

जयपूरमधील शास्त्रीनगर भागातील कनवाटिया हॉस्पिटलमध्ये मंगळवारी हा प्रकार समोर आला. लसीकरणादरम्यान रुग्णालयाच्या स्टाफला लसींचे डोस अनेकदा शोधूनही मिळाले नाहीत. त्यानंतर याप्रकरणी कलम ३८० अंतर्गत डोस चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञाताविरोधात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून आरोग्य विभाग या बेपत्ता लसींच्या डोसची चौकशी करणार आहे.

हेही वाचा: RT-PCR टेस्टवर विश्वास ठेवायचा कसा? लक्षणे असूनही रिपोर्ट निगेटिव्ह

हे चोरीला गेलेले लसींचे डोस बाहेर काळ्या बाजारात विकले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ८ मार्च रोजी राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी दावा केला होता की राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींच्या डोसचा तुटवडा आहे. त्याचबरोबर सध्या देशातील अनेक भागात सध्या लसींचा तुटवडा भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर डोस चोरीला गेल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना प्रतिबंधक लस सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत दिली जात आहे, तर खासगी लसीकरण केंद्रांवर यासाठी २५० रुपये फी आकारली जात आहे.

हेही वाचा: तीरथसिंह रावत पुन्हा बरळले; 'कुंभमेळ्यामुळं नाही, मरकजमुळं कोरोना पसरेल'

दरम्यान, केंद्र सरकार देशात लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळू शकेल. यापार्श्वभूमीवर सरकारने परदेशातील लस अर्थात रशियामध्ये तयार झालेली 'स्पुटनिक व्ही' या कोरोना प्रतिबंधक लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली असून डीजीसीआयनंही या लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे 'कोविशिल्ड', 'कोव्हॅक्सिन'नंतर आता 'स्पुटनिक व्ही' लस देखील भारतात देण्यात येणार आहे.