Shraddha Murder Case : २७ वर्षांपूर्वी 'त्या' नराधमाने तिला तंदूरमध्ये टाकून जिवंत जाळलं होतं!

ह्या आफताबप्रमाणेच तो सुशिल होता, ज्याने आपल्या बायकोला निर्घृणपणे मारून टाकलं. त्याची कहाणी माहित आहे का?
Naina Sahni Murder Case
Naina Sahni Murder CaseSakal
Updated on

दिल्लीतल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणामुळे सगळा देश हादरून गेला आहे. ज्या क्रूरतेने श्रद्धाचा प्रियकर आफताबने तिचा खून केला, त्याने प्रत्येकाच्याच अंगावर काटा उभा राहिला. पण तुम्हाला माहित आहे का असंच एक भयंकर हत्याकांड २७ वर्षांपूर्वी घडलं होतं.

काय घडलं होतं २७ वर्षांपूर्वी?

दिल्लीतल्या मुख्य भागातल्या अशोक विहार परिसरात बगिया रेस्टॉरंटमधून आगीचे लोट दिसत होते. बाहेरून पाहणाऱ्याला जणू हॉटेलला आग लागलीये की काय असंच वाटलं असतं. पण त्यावेळी बाहेर कोणीच नव्हतं. वेळ मध्यरात्रीची होती आणि तारीख होती २ जुलै १९९५. तिथून पेट्रोलिंगसाठी एक होमगार्ड आणि एक कॉन्स्टेबल चालले होते. कॉन्स्टेबलने आत वाकून पाहण्याचा प्रयत्न केला, पण गेटवरच्या एका व्यक्तीने त्याला अडवलं. या व्यक्तीचं नाव होतं सुशिल. पण कॉन्स्टेबलला तिथे काहीतरी शंकास्पद होत असल्याचा सुगावा लागला होता. त्याने विचारलं असता आपण पार्टीचं पोस्टर जाळत असल्याचं सुशिलने सांगितलं.

Naina Sahni Murder Case
Shraddha Murder Case: आफताब तिला मांस खायची सक्ती करायचा; खाल्लं नाही तर मारायचा; शेजाऱ्यांचा दावा

कॉन्स्टेबलला शंका आली, म्हणून त्याने हॉटेलच्या मागच्या बाजूने भिंतीवरून उडी मारली, आत पाहिलं तर तंदूरमध्ये आग लावली होती आणि एक जण या आगीमध्ये बटर ओतत होता आणि आग अधिकच पेटत होती. या तंदूरात चिकन, रोटी बनवले जायचे. त्यातच ही आग लागली होती. कॉन्स्टेबलने आणखी जवळ जायचा प्रयत्न केला, तेवढ्यात तिथे सुशिल आला आणि त्याने कॉन्स्टेबलला गोड बोलून बाहेर काढलं. कॉन्स्टेबलची शंका अधिकच बळकट झाली कारण त्याने त्या तंदूरमध्ये कोणा माणसाची बोटं पाहिली होती.

Naina Sahni Murder Case
Shraddha Murder Case : खुनाचा तपास CBI कडे सोपवा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

त्याने तात्काळ आपल्या इतर सहकाऱ्यांना याविषयी कळवलं आणि बोलावून घेतलं. त्यावेळी कळलं की या तंदूरमध्ये एक अख्खा माणूस जळत होता. सुशिलने तेवढ्यात पळ काढला होता. सुशिल हाच त्या हॉटेलचा मालक होता आणि जळणारी व्यक्ती त्याची पत्नी नैना होती. यातूनच उघडकीस आलं दिल्लीतलं प्रसिद्ध तंदूर कांड. हॉटेलचा मालक सुशिल शर्मा हाच यातला मुख्य आरोपी होता. तो युथ काँग्रेसचा अध्यक्ष होता. ही घटना घडल्यावर सुशिल पळून जाऊन बँगलोरमध्ये लपून बसला होता. तिथून तिरुपतीला जाऊन टक्कल करून आला, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, पण अखेर आफताबप्रमाणे सुशिललाही दिल्ली पोलिसांनी पकडलं आणि अटक केली.

पण त्याने नैनाला का मारलं?

सुशिलची बायको नैना साहनीसुद्धा काँग्रेसमध्येच होती. त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांनी दोघांनी गुपचूप लग्न केलं. पण सुशिलने अद्याप आपलं लग्न उघड केलं नव्हतं. ते करिअरसाठी बाधक ठरेल म्हणून सुशिल टाळत होता. इकडे नैना त्याच्या मागे आपले संबंध उघड करण्याचा तगादा लावून होती. या दोघांमध्ये खटके उडत असत.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

दरम्यान, या सगळ्यात नैनाचा आणखी एक जवळचा मित्र झाला. ती त्याच्याशी फोनवर बोलत असे. एक दिवस ती फोनवर बोलत असताना सुशिल घरी आला. त्याने चौकशी केल्यावर नैनाने उडवाउडवीची उत्तरं दिली. चिडलेल्या सुशिलने फोन हिसकावून घेतला आणि ऐकलं तर एका पुरुषाचा आवाज होता. त्याने काहीही विचार न करता रागाच्या भरात तिला धडाधड तीन गोळ्या झाडल्या. पण आता प्रेताचं काय करायचं? या भीतीने आपला मित्र रमेशला त्याने याविषयी सांगितलं. त्याच्याच सल्ल्यानुसार, सुशिलने नैनाचं प्रेत गाडीत टाकून ते हॉटेलमध्ये आणलं आणि तंदूरमध्ये जाळलं.

सुशिलला काय शिक्षा झाली?

सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये या प्रकरणाचा निकाल दिला. त्याला फाशी नाही पण जन्मठेप झाली. सुशिलला केलेल्या गुन्ह्याबद्दल पश्चाताप झाला आणि त्यापूर्वी त्याच्या नावावर कोणताही गुन्हा नाही, हे लक्षात घेऊन त्याला जन्मठेप सुनावण्यात आली. चार ते पाच वर्षांपूर्वी सुशिल आपली २३ वर्षांची शिक्षा भोगून आता बाहेर आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com