
"सरकारी अॅटिट्यूड बाजूला ठेवा अन्यथा पॅकअप"; BSNL कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम!
नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNLचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारनं तब्बल १.६४ लाख कोटींच पॅकेज दिलं आहे. हे पॅकेज सरकारनं सहजासहजी दिलेलं नाही, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे, असं केंद्राचं म्हणणं आहे. त्यामुळंच जर सरकारी बाबूंप्रमाणं काम करायचं असेल तर सरळ घरचा रस्ता धरावा असा थेट इशाराच केंद्रीय टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. (Shun sarkaari attitude or pack up Telecom Minister ultimatum to BSNL staff)
हेही वाचा: पुणे : MPSC परीक्षेदरम्यान गैरप्रकार; फोन, ब्लूट्युथचा वापर केल्यानं खळबळ!
याबाबतचा मोबाईल संदेश सर्व कर्मचाऱ्यांना सरकारकडून पाठवण्यात आला आहे. या मेसेजमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की, कर्मचाऱ्यांनी आता सरकारी अॅटिट्यूड सोडावा आणि अपेक्षित कामगिरी करुन दाखवावी अन्यथा अशा कर्मचाऱ्यांना सक्तीनं घरी पाठवलं जाईल.
हेही वाचा: Bhandara Gang Rape : दोन रात्र वेदनेनं विव्हळत होती पीडिता; वाचा घटनाक्रम
वैष्णव यांनी बीएसएनएलच्या ६२,००० कर्मचाऱ्यांना हा इशारा दिला आहे. नुकत्याच झालेल्या बीएनएनएलच्या वरिष्ठ व्यवस्थापकांसोबतच्या बैठकीत वैष्णव यांनी याचे संकेत दिले होते. आपण जर कंपनीला वाचवण्यासाठी १.६४ लाख कोटी दिले आहेत तर तसं कामही होणं अपेक्षित आहे. जर ते जमत नसेल तर तुम्ही पॅकअप करा, असा थेट इशारा देताना याविषयी तुमच्या मनात शंका असता कामा नये असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा: तुम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्हायचं अन् बाकीच्यांच काय? अजित पवार संतापले
दरम्यान, मंत्री वैष्णव यांनी बीएसएनएलच्या कर्मचार्यांना आता तीव्र स्पर्धात्मक होण्यास सांगितले आहे. विशेषत: रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांशी लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेशच त्यांनी या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर MTNLला आता भविष्य राहिलेलं नाही, असं विधान अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. आम्ही तिथं जास्त काही करु शकत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की, एमटीएनएलच्या मर्यादा काय आहेत? आणि त्याला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपल्याला यासाठी वेगळी मेहनत करावी लागणार आहे. त्यानंतरच पुढील रणनिती ठरवू, असंही अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
Web Title: Shun Sarkaari Attitude Or Pack Up Telecom Minister Ultimatum To Bsnl Staff
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..