BJP Chief Minister in RSS Event | "समान नागरी कायदा आणि मदरसे बंद करणं मुस्लिमांच्या फायद्याचं" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

muslim
"समान नागरी कायदा आणि मदरसे बंद करणं मुस्लिमांच्या फायद्याचं"

"समान नागरी कायदा आणि मदरसे बंद करणं मुस्लिमांच्या फायद्याचं"

भारताला राज्यांचा संघ म्हणून राहुल गांधी अप्रत्यक्षपणे फुटीरतावादी घटकांना प्रोत्साहन देत आहेत, अशी टीका आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात बोलताना ते असंही म्हणाले की, जे मदरसे बंद करतायत आणि समान नागरी कायद्याबद्दल बोलतायत ते मुस्लिमांचे हितचिंतक आहेत. (BJP Assam Chief Minister Himanta Biswa Sarma in RSS Event)

हेही वाचा: मोदींनी देशाचे रक्षण करावे; चीनबाबत राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) पंचजन्य आणि ऑर्गनायझर या नियतकालिकांना ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात हिमंता बिस्वा सर्मा बोलत होते. ते म्हणाले, "जर भारत हा राज्यांचा संघ असेल तर ५००० वर्षांच्या समृद्ध इतिहासाचं का? जेव्हा काँग्रेस स्वतःला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणवतं आणि देशभरात सभा, बैठका घेतं, तेव्हा त्यांचा अर्थ राज्यांचा संघ असा असतो का? देशाला राज्यांचा संघ म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) देश तोडण्याची भाषा करत आहेत. अप्रत्यक्षपणे ते इथल्या फुटीरतावादी शक्तींना प्रोत्साहन देतायत. पण हा त्यांचा दोष नाही. त्यांनी कदाचित जेएनयूमधल्या कोणाकडून तरी शिकवणी घेतली असेल".

हेही वाचा: आसाममधील मदरसे होणार बंद; फसवणुकीने होणाऱ्या हिंदू-मुस्लिम विवाहांनाही आळा

सर्मा यांनी आपल्या राज्यातले सरकारी अनुदानित मदरसे (Madarsa) बंद केले, त्याबद्दल ते म्हणाले की,जर त्यांना शिक्षणात प्रगती करायची असेल तर मुस्लिमांनी मदरश्यांपासून दूर व्हायला हवं. तुम्हाला जर धर्म शिकवायचा असेल तर ते तुमच्या घरी शिकवा. शाळेत तुम्ही फक्त विज्ञान आणि गणितच शिकायला हवं. मदरसे बंद करणं आणि समान नागरी कायदा लागू करणं हे मुस्लिमांच्या फायद्याचं आहे. आम्हाला हे हिंदुत्वासाठी करण्याची गरज नाही. जे अशी मागणी करतात, त्यांना भारतीय मुस्लिमांनी आपला मित्र मानायला हवं.

Web Title: Shutting Down Madrassas Bringing Ucc Is For Benefit Of Muslims Himanta At Rss Event

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top