

Siddaramaiah Resigns
Esakal
Karnataka CM Siddaramaiah Resigns: कर्नाटकाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चांना अखेर पुर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनंतर आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या पदाचा राजीनामा देणार आहेत. पक्षाच्या आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीत सिद्धरामय्या यांनी राजीनामा देण्यास जात असल्याचं सांगितलं. सिद्धरामय्या यांच्यानंततर मुख्यमंत्रीपदाची माळ डीके शिवकुमार यांच्या गळ्यात पडणार आहे. अद्याप याबाबत घोषणा झालेली नाही. मात्र सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याची घोषणा करताच डीके शिवकुमार यांनी सिद्धरामय्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले.