सिद्धू मुसेवालानंतर आणखी एक प्रसिद्ध गायक निशाण्यावर; पोलिसांची भीती

पोलिसांना यावरून पंजाबमध्ये गँगवॉर होण्याची शंका आहे.
Siddhu Moosewala
Siddhu MoosewalaSakal

सिद्धू मुसेवाला या गायकाची काल भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे देशभरातलं वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र पोलिसांना आता एक वेगळीच शंका सतावत आहे. पंजाबमध्ये या प्रकरणावरून गँग वॉरची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Siddhu Moosewala)

Siddhu Moosewala
गायक मुसेवाला हत्या प्रकरणाची होणार न्यायालयीन चौकशी? सरकारचं हायकोर्टाला पत्र

त्याचसोबत आणखी एका मोठ्या गायकाचा जीव धोक्यात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हा गायक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगच्या जवळचा आहे, त्यामुळे याच्या जीवालाही धोका आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. सुरक्षेच्या कारणासाठी पोलिसांनी या गायकाचं नाव जाहीर केलेलं नाही.

Siddhu Moosewala
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या

सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनुसार, गौरव पटियाल म्हणजे लकीची गँग ही लॉरेन्स बिश्नोईच्या गँगपेक्षा शक्तिशाली आहे. लकी पटियाल हा पाकिस्तानमधल्या दहशतवाद्याशी संबंधित आहे. लकी पटियाल सध्या त्याच्या गँगचं काम अर्मेनियामध्ये बसून पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com