मुसेवालाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांचा मोठा खुलासा, लॉरेन्स बिश्नोई मास्टरमाइंड

फरारी सौरभ महाकाळच्या जवळच्या शूटरने मुसेवालावर गोळ्या झाडल्याचे दिल्ली पोलिसांचे सांगितले.
Musewala murder case punjab gangster lawrence bishnoi withdrew from the delhi high court fake encounter
Musewala murder case punjab gangster lawrence bishnoi withdrew from the delhi high court fake encounterSakal

नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Siddu Moosewala) यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बुधवारी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींची ओळख पटली असून, मुसेवाला खून प्रकरणाचा मास्टरमाइंड लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. फरारी सौरभ महाकाळच्या जवळच्या शूटरने मुसेवालावर गोळ्या झाडल्याचे दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी धालीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Lawrence Bishnoi Is Master Mind Behind The Siddu Moosewala Murder Case )

दरम्यान, या हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मोठी कारवाई करत मुख्य शूटरचा जवळचा साथीदार सौरभ महाकाळला अटक केली असून, त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष सीपी एचजीएस धालीवाल यांनी सांगितले की, महाराष्ट्र पोलिसांना महाकाळची 14 दिवसांची कोठडी मिळाली आहे. या हत्याकांडात किमान 5 लोक सामील असून, एकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तो शूटरपैकी एकाचा जवळचा सहकारी आहे, परंतु त्याचा हत्येत सहभाग नसून, खऱ्या शूटर्सना लवकरच अटक केली जाईल असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले.

सिद्धु मुसेवाला हे 29 मे रोजी त्यांच्या सहकाऱ्यांसह पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावातुन त्यांच्या कारमधून जात होते. त्यावेळी त्यांचा पाठलाग करीत टोळक्‍याने त्यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडून त्यांची खुन केली होती. या घटनेचे पंजाबमध्ये तीव्र पडसाद उमटले असतानाच, केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणाचा तपास स्वतंत्र पथकामार्फत करण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, दिल्लीतील गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने त्याच्या सहकाऱ्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मुसेवाला यांची केल्याचे त्याच्या चौकशीतुन पुढे आले. हत्या करणाऱ्यांमध्ये पंजबामधील 3, राजस्थानातील तीन व पुण्यातीन संतोष जाधव व सौरभ महाकाळ या दोघांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते.

संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांनी 1 ऑगस्ट 2021 रोजी आंबेगाव तालुक्‍यात ओंकार बाणखेले याचा वैमनस्यातून गोळ्या झाडून खून केला होता. तेव्हापासून दोघेजण पसार होते. ग्रामीण पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई केली होती. दरम्यान, जाधव व महाकाळ पंजाब, राजस्थानात फिरून तेथेही विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करीत होते. राजस्थानमधील जवाहरनगर श्रीगंगानगर येथे त्यांनी खंडणीच्या प्रकरणातुन एका व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करीत खुनाचा प्रयत्न केला होता. त्यावेळी जाधवला अटक करण्यात आली होती, तेव्हा त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संपर्क आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com