
- रेल्वे स्टेशनवर गाणं गाणारी रानू मोंडल आज, सोशल मीडियावर पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळेस तिचं गाणं चर्चेचा विषय नाहीय तर तिचा मेकअप चर्चेत आला.
नवी दिल्ली : रेल्वे स्टेशनवर गाणं गाणारी रानू मोंडल आज, सोशल मीडियावर पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळेस तिचं गाणं चर्चेचा विषय नाहीय तर तिचा मेकअप चर्चेत आला. नुकत्याच एका फॅशन शोमध्ये राहून मोंडलनं हजेरी लावली होती. तिचा मेकअप पाहून सगळेच चकीत झाले.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
रानू मोंडलला संगीतकार हिमेश रेशमियानं संधी दिली. तिचं गाणं 'तेरी मेरी' हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. रानू मोंडल एका रात्रीत सुपरस्टार झाली. स्टेशनवरून थेट सेलिब्रिटी होणंही शक्य असल्याचं तिनं दाखवून दिलं. आज रानू मोंडल सगळ्यांना माहिती आहे. रानूच्या या लोकप्रियतेमुळं तिला एका फॅश शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यात ती रॅम्पवरही आली. पण, तिच्या आगमनानंतर सगळे चकीत झाले.
अक्षरशः मेकअपचा थर लावून आलेल्या रानूला पाहिल्यानंतर सुरुवातीला तिला ओळखणंही मुश्कील होतं. पण, तिला ओळखल्यानंतर मात्र सोशल मीडियावर तिच्यावर मिम्सचा धुरळा उडाला. एका पाठोपाठ एक मिम्स शेअर झाले आणि रानूला नेटकऱ्यांनी लक्ष्य केलं. तिला फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातीतत घ्या, सगळं श्रेय तिच्या मेकअपमनला असे मिम्स इंटरनेटवर व्हायरल झाले.