
झारखंडमधील कोरबा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने किरकोळ वादातून आपल्या वहिनीला बेदम मारहाण केली. या घटनेत वहिनीचे डोके फ्रॅक्चर झाले. परिसरातील लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती आणखी बिकट झाली. अखेर ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. भांडणाचे हे प्रकरण कोरबा येथील बांगो पोलीस स्टेशन परिसरातील रिंगानिया नवापारा गावातील आहे.