अंधार पडला की घरात सापाची पिले येतात अन्...

वृत्तसंस्था
बुधवार, 20 मे 2020

एका घरामध्ये 12 जण राहात असून, सर्वजण घाबरले आहेत. कारण, त्यांच्या घरामध्ये दररोज सापाची पिले निघतात. आतापर्यंत तब्बल 123 पिले निघाली असून, दररोज हा आकडा वाढतच चालला आहे.

भिंड (मध्य प्रदेश): एका घरामध्ये 12 जण राहात असून, सर्वजण घाबरले आहेत. कारण, त्यांच्या घरामध्ये दररोज सापाची पिले निघतात. आतापर्यंत तब्बल 123 पिले निघाली असून, दररोज हा आकडा वाढतच चालला आहे.

जिद्दीला सलाम: बाबा, काळजी न करता बसा म्हणाली अन्...

चचाई या गावामध्ये राजकुमार कुशवाहा यांचे घर आहे. घरामध्ये 12 जण राहतात. पण, संपूर्ण कुटुंब काही दिवसांपासून काळजीत आहे. अंधार पडू लागला की 5 ते 25 सापाची पिले बाहेर येतात आणि घरभर फिरायला सुरवात करतात. एक-दोन नव्हे तर 123 पिले त्यांनी पकडून जंगलात नेऊन सोडली आहेत. घरामध्ये प्रवेश कसा करायचा असा प्रश्न कुटुंबियांना पडला आहे. यामुळे घरातील लहान मुले तर घरामध्ये प्रवेश करायला घाबरतात. गावातील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मनाने श्रीमंत असलेल्या भिकाऱयाची दानत मोठी...

राजकुमार यांनी सांगितले की, 'एक दिवस संध्याकाळी साडे सातच्या सुमारास 4 ते 5 सापाची पिले फरशीवर दिसली. ही सापाची पिले उचलली आणि गावाच्या बाहेर सोडून दिली. पण, दुसऱया दिवशी पुन्हा पिले निघाली. गेल्या आठ दिवसांपासून दररोज अंधार पडला की पिले बाहेर येतात. एके दिवशी तर तब्बल 51 पिले बाहेर आली होती. पिले पाहिल्यानंतर ती कोब्रा जातीची असल्याचे सर्पमित्राने सांगितले.'

Video: इम्रान खान यांचा 'सेक्‍सुअल परफॉर्मन्स'...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: small snake came out from home in eight days family in panic at madhya pradesh