पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे स्पष्टीकरण; म्हणाले, वक्तव्याचा...

devendra fadnavis Latest Marathi News
devendra fadnavis Latest Marathi Newsdevendra fadnavis Latest Marathi News

मुंबई : ‘छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले’, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. तसेच मुख्यमंत्रीपदावरून भाजपमध्ये खदखद असल्याचे बोलले जात होते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी प्रतिक्रिया दिली आहे. (devendra fadnavis Latest Marathi News)

‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आपल्या सगळ्यांना अस वाटत होते आपलेच सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहे. मात्र, अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने धक्का बसला’ असे त्यांना म्हणायचे असल्याचे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले. सोबतच आपल्या सर्वांचे नेते एकनाथ शिंदे असल्याचे त्यांनी सांगितले.

devendra fadnavis Latest Marathi News
पाच वर्षीय भाचीची मामाने केली हत्या; आंबा मागितल्याने आला राग

‘केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) झाले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुःख झाले. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता’, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पनवेलच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. नेटकऱ्यांच्या टीकेनंतर भाजपने खबरदारी घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे ते भाषण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवले. आता चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी पूर्ण प्रकरण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com