esakal | Video: गाढवाच्या तोंडात अडकला साप अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

snake in donkey mouth video viral on social media

रस्त्याच्या कडेला गाढव गवत खात असताना त्याच्या तोंडात साप आला. दोघांची जीवन-मरणाची लढाई सुरू झाली. पण, दोघांनाही जीव गमवावा लागला. संबंधित घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Video: गाढवाच्या तोंडात अडकला साप अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर (राजस्थान): रस्त्याच्या कडेला गाढव गवत खात असताना त्याच्या तोंडात साप आला. दोघांची जीवन-मरणाची लढाई सुरू झाली. पण, दोघांनाही जीव गमवावा लागला. संबंधित घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सनी लिओनीने घेतला 'बीए'ला प्रवेश!

साप आणि मुंगूस यांच्यातील झटापटीचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. पण, गाढव आणि साप यांच्यातील झटापटीचे व्हिडिओ पाहायला मिळत नाहीत. एका गाढवाच्या तोंडात साप अडकल्यानंतर दोघेही एकमेकांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कशी धडपड करत आहेत, हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीपलखुंट परिसरात असलेल्या माही नदीच्या किनाऱ्यावर गाढवं चरत होती. गवतात बसलेला साप गाढवाच्या तोंडात आला. सापाच्या मधील भाग गाढवाच्या तोंडात अडकला. गाढवाने साप आपल्या तोंडातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गाढवाने डोकं आणि मान अनेकदा हलवली. पण, साप काही बाहेर येईना आणि तोंडाच्या आतही जात नव्हता. दुसरीकडे गाढवाच्या तोंडातून बाहेर पडण्यासाठी सापही प्रयत्न करत होता. त्यालाही बाहेर पडता येत नव्हते.

गाढव आणि साप स्वत:चा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत राहिले. संघर्षादरम्यान सापाने गाढवाचा चावा घेतला. काहीवेळानंतर सापाचा मृत्यू झाला तर तीन तासांनी गाढवाचा मृत्यू झाला. अखेर दोघांनाही जीव गमवावा लागला. रस्त्यावरून जाणाऱया नागरिकांनी संबंधित घटना मोबाईलमध्ये कैद केली. पण, जवळ कोणी गेले नाही. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्नानंतर नवरीने 'असेच' रडायला हवे...