esakal | सनी लिओनीने घेतला 'बीए'ला प्रवेश!
sakal

बोलून बातमी शोधा

sunny leones name on merit list of kolkata college

अभिनेत्री सनी लिओनी हिने महाविद्यालयात बीएसाठी प्रवेश घेतला असून, तिचे नाव ऑनलाइन यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

सनी लिओनीने घेतला 'बीए'ला प्रवेश!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकताः अभिनेत्री सनी लिओनी हिने महाविद्यालयात बीएसाठी प्रवेश घेतला असून, तिचे नाव ऑनलाइन यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. पण, कोणीतरी हा खोडसळपणा केला असावा, असा खुलासा नंतर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने केला आहे.

...म्हणून स्वतःचे कान कापून ठेवले बरणीत

कोलकाता येथील आशुतोष कॉलेजच्या बीए प्रवेशाची यादी नुकतीच ऑनलाइन प्रसिद्ध झाली आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सनी लिओनी हिचे नाव प्रथम क्रमांकावर होते. वेबसाईटवर दाखविण्यात आलेल्या यादीमध्ये सनी लिओनी हिच्या नावासह अर्ज आयडी आणि रोल नंबर होता. शिवाय, यादीमध्ये सनीला बारावीच्या परीक्षेत 'बेस्ट फोर' मध्ये 400 म्हणजे पैकीच्या पैकी गुण असल्याचे दाखवले होते. यामुळे यादी पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. शिवाय, कॉलेज परिसरामध्ये सनी लिओनी हिची चर्चा सुरू झाली. अनेक विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सऍपवरून यादी व्हायरल होऊ लागली. सनी कॉलेजमध्ये प्रवेश घेणार असल्याच्या चर्चेला उधान आले होते.

कर्मचाऱयाच्या मृतदेहासाठी कंपनीने खर्च केले 50 लाख!

महाविद्यालयाच्या व्यवस्थापनापर्यंत चर्चा गेल्यानंतर त्यांना खुलासा करताना सांगितले की, कोणीतरी मुद्दामहून हा खोडसाळपणा केला आहे. तिच्या नावाने कोणीतरी बनावट अर्ज भरला असावा. आम्ही संबंधित विभागाला तात्काळ दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. शिवाय, याबाबतची चौकशी करू करण्यात आली आहे.'

लग्नानंतर नवरीने 'असेच' रडायला हवे...

loading image