Video: मंदिरात अर्पण केलेल्या दूधाचा 'असा' सदुपयोग

वृत्तसंस्था
Tuesday, 4 August 2020

मंदिरात भाविकांकडून दुधाचा अभिषेक केला जात असून, हजारो लीटर दूध अर्पण केले जाते. मात्र, या दुधाचा सदुपयोग केला तर नक्कीच मुक्या प्राण्यांची भूक भागवली जाऊ शकते.

नवी दिल्ली: मंदिरात भाविकांकडून दुधाचा अभिषेक केला जात असून, हजारो लीटर दूध अर्पण केले जाते. मात्र, या दुधाचा सदुपयोग केला तर नक्कीच मुक्या प्राण्यांची भूक भागवली जाऊ शकते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्सनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

'कोरोना करी’ आणि ‘मास्क नान’चा अहवाल पॉझिटिव्ह...

मंदिरामध्ये भाविकांकडून आलेले दुध एकत्र करून ते मुक्या आणि भुकेल्या जनावरांना पाजण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, मंदिरात जमा केलेले दूध दोन मोठ्या भांड्यात ओतले जाते. भुकेली प्राणी ते पिताना दिसतात. यामुळे या दुधाचा सदुपयोग होताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओ इंस्टाग्रामवर Amtmindia नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यांनी शीर्षक देताना लिहिले आहे की, 'मंदिराच्या स्वयंसेवकांकडून जमा केलेले दूध रस्त्यावरील मुक्या जनावरांना पाजले जाते. ज्यामुळे या प्राण्यांची भूक शांत होत आहे.'

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी या उपक्रमाचे कौतुक करताना ठिकठिकाणी असे उपक्रम राबवायला हवेत, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

कोरोनामुळे लाखोंच्या नोटा वॉशिंगमशीनमध्ये धुतल्या अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: milk collected in temple for rituals is now morally served to feeding strays video viral