Social Media वर कुणाची हवा, काँग्रेस, भाजप की आप? निवडणुकीच्या धामधुमीत 'या' पक्षाची आघाडी

Instagram: इंस्टाग्रामवर काँग्रेसने भाजपला मागे टाकले आहे. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत काँग्रेसच्या इन्स्टा अकाउंटवर १३.२ लाख नवीन फॉलोअर्स जोडले गेले.
Social Media
Social MediaEsakal
Updated on

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात आणि जनतेशी संपर्क साधण्यात व्यस्त आहेत. अलिकडे सोशल मीडिया हे निवडणूक प्रचाराचे प्रमुख माध्यम म्हणून उदयास आले आहे.

देशातील सर्वात मोठा पक्ष भाजपचे इंस्टाग्रामवर 76 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या काँग्रेसच्या फॉलोअर्सची संख्या 40 लाख, आम आदमी पक्षाची 12 लाख आणि तृणमूल काँग्रेसची 1 लाख आहे.

'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर), भाजपचे 2.1 कोटी, काँग्रेसचे 1.04 कोटी, आपचे 65 लाख आणि तृणमूल काँग्रेसचे 7 लाख फॉलोअर्स आहेत.

दुसरीकडे, यूट्यूबवर आपचे 59 लाख, भाजपचे 58 लाख, काँग्रेसचे 44 लाख आणि टीएमसीचे 6 लाख सब्सक्रायबर्स आहेत.

सोशल मीडियाच्या जवळपास सर्वच प्लॅटफॉर्मवर भाजप इतर राजकीय पक्षांपेक्षा खूप पुढे असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. पण हे एकूण आकडे आहेत.

जर आपण नवीन युजर्सबद्दल बोललो तर तर परिस्थिती थोडी बदलते. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर नवीन युजर्स जोडण्याच्या बाबतीत काँग्रेस आणि आपने भाजपला मागे टाकले आहे. या प्लॅटफॉर्मवर काँग्रेस आणि आपच्या नवीन फॉलोअर्सची संख्या या वर्षी जानेवारीपासून दर महिन्याला वाढली आहे.

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, काँग्रेसला जानेवारी 2024 मध्ये फेसबुकवर 59 हजार नवीन फॉलोअर्स, फेब्रुवारीमध्ये 70 हजार आणि मार्चमध्ये 1.08 लाख नवीन फॉलोअर्स मिळाले.

जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये भाजपच्या नवीन खात्यांची संख्या सुमारे 1.2 लाख आणि मार्चमध्ये 1.7 लाख होती. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या नवीन फॉलोअर्सचे प्रमाण पाहिल्यास काँग्रेस भाजपवर बाजी मारताना दिसत आहे. मात्र, एकूण आकड्यांवर नजर टाकली तर भाजप खूपच पुढे आहे.

Social Media
Travel Advisory: भारतीय नागरिकांनी 'या' दोन देशांत जाणे टाळावे, परराष्ट्र मंत्रालयाने का दिला अशा इशारा

YouTube वर 'आप'ची आघाडी

यूट्यूबवर सर्वोत्तम कामगिरी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची आहे. काँग्रेसचे यूट्युब चॅनलही वाढले आहे. पण, भाजपच्या यूट्यूब चॅनलची स्थिती फारशी चांगली नाही.

या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत 'आप'च्या यूट्यूब चॅनेलवर ५.९ लाख सदस्य वाढले आहेत. एकट्या मार्चमध्ये त्यात ३.६ लाखांची वाढ झाली आहे.

इतर पक्षांच्या तुलनेत यूट्यूबवर भाजपच्या सदस्यांची संख्या या तीन महिन्यांत ५.३ लाखांनी वाढली आहे. या काळात काँग्रेसला 5 लाख नवीन सब्सक्रायबर्स मिळाले.

दरम्यान, भाजपच्या चॅनलवर अपलोड झालेल्या व्हिडिओंच्या व्ह्यूजची संख्या सर्वाधिक होती. या तीन महिन्यांत भाजपच्या व्हिडिओंना 43 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 'आप'ला 30.78 कोटी आणि काँग्रेसला 16.69 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

Social Media
Lok Sabha Election 2024: राजस्थानमध्ये RRR वाढणार भाजपची डोकेदुखी, नरेंद्र मोदींसह योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंह मैदानात

इंस्टा वर काँग्रेसची बाजी

इंस्टाग्रामवर काँग्रेसने भाजपला मागे टाकले आहे. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत काँग्रेसच्या इन्स्टा अकाउंटवर १३.२ लाख नवीन फॉलोअर्स जोडले गेले.

भाजपच्या नवीन फॉलोअर्सची संख्या 8.5 लाख आणि आपच्या अनुयायांची संख्या 2.3 लाख होती. टीएमसीच्या इंस्टाग्राम अकाऊंटला केवळ 6000 नवीन फॉलोअर्स मिळाले आहेत.

एकूणच, चार राजकीय पक्षांपैकी भाजप एकंदरीत मजबूत आहे, परंतु काँग्रेस आणि आपच्या स्थितीतही सुधारणा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com