माफ करु शकत नाही...ऑनलाइन सुनावणीत शर्टलेस वकिलावर सुप्रीम कोर्ट संतप्त

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

राजस्थान उच्च न्यायालयात जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान एक वकील बनियान घालून सहभागी झाले होते.

नवी दिल्ली- सुदर्शन टीव्हीच्या एका प्रकरणाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुनावणीदरम्यान एक वकील शर्ट न घालता कॅमेरासमोर बसला. या प्रकारामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तीव्र शब्दांत नाराजी दर्शवली आहे. यापूर्वीही ऑनलाइन सुनावणीदरम्यान एक ज्येष्ठ वकील स्मोकिंग करताना दिसले होते. तर एक वकील बनियानवरच सुनावणीत सहभागी झाले होते. 

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, खंडपीठाचे नेतृत्त्व करत असलेले सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कोण होते असा सवाल केला. त्यावर कोणीच उत्तर दिले नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी अशा वर्तनावर आक्षेप घेतल्याचे सांगण्यात येत आहे. खंडपीठाच्या सदस्य इंदू मल्होत्रा यांनीही नाराजी व्यक्त करत हे काम माफी योग्य नसल्याचे म्हटले. 

हेही वाचा- ''लेविनाने केलेले आरोप खोटेच''; महेश भट्ट गेले कोर्टात

सध्या सर्वोच्च न्यायालयासह इतर न्यायालयांमध्येही ऑनलाइन सुनावणी होत आहे. एखाद्या वकिलाने शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वी राजीव धवन नावाचे एक ज्येष्ठ विधिज्ञ एका ऑनलाइन सुनावणीदरम्यान स्मोकिंग करताना दिसले होते. 

राजस्थान उच्च न्यायालयात जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान एक वकील बनियान घालून सहभागी झाले होते. त्यावेळीही न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली होती. कोरोनामुळे न्यायालयाचे कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुरु आहे. वकिलांनी योग्य पेहरावात यात सहभागी व्हावे. याचिकाकर्त्यांचे वकील योग्य पेहरावात नसल्यामुळे सुनावणी स्थगित केली जात आहे, असे म्हणत न्यायालयाने वकिलांना फटकारले होते.

हेही वाचा-'मोदींना 6 भाऊ-बहीण'; नितीश कुमारांच्या 8-9 मुलांच्या टीकेवर तेजस्वींचा पलटवार

गुजरात उच्च न्यायालयाने ऑनलाइन सुनावणीदरम्यान स्मोकिंग करणाऱ्या एका वकिलाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is something unpardonable supreme court Judges shocked as advocate appears shirtless for online hearing