BJP vs BSP: खेळ राजकारणाचा! भाजप नेत्याच्या लेकाला मायावतींच्या पक्षाचे तिकीट

Pratapgarh UP: प्रथमेशच्या कुटुंबीयांनी भाजपचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे प्रतापगडमधील या रंजक लढतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
BSP candidate Uttar pradesh Pratapgarh Prathamesh Mishra
BSP candidate Uttar pradesh Pratapgarh Prathamesh MishraEsakal

2024 च्या लोकसभा निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील प्रतापगड लोकसभा जागेवरील लढत रंजक बनली आहे. वास्तविक, येथून बसपने युवा नेते आणि व्यवसायाने वकील प्रथमेश मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे.

विशेष म्हणजे प्रथमेशचे वडील शिव प्रकाश हे भाजपचे नेते आहेत, इतकेच नाही तर ते कौशांबी लोकसभा मतदारसंघाचे पक्ष प्रभारी देखील आहेत. प्रथमेशची आई सिंधुजा मिश्रा याही भाजपमध्ये आहेत. (Son Of BJP Leader Fighting On BJP Ticket In Uttar pradesh Pratapgarh)

प्रथमेशचे आई-वडील दोघेही पूर्वी बसपमध्ये होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी बसप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते पक्षात सक्रिय आहेत. पक्षाने त्यांना प्रदेश कार्यकारिणीचे सदस्यही केले आहे.

बसपचा उमेदवार प्रथमेशचे वडील समाजसेवेच्या क्षेत्रातही ते सक्रिय आहेत. वडील चंद्रदत्त सेनानी यांच्या नावाने स्थापन केलेल्या ट्रस्टद्वारे ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यांचा मुलगा प्रथमेश याला वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी बसपाचे तिकीट मिळाल्याने प्रतापगढ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंजक असल्याचे दिसत आहे.

BSP candidate Uttar pradesh Pratapgarh Prathamesh Mishra
Viral Video: पत्नी जावायाच्या प्रेमात पडल्याचे कळताच पतीने लावून दिले लग्न, टाळ्यांच्या कडकडाटात गावानेही केले स्वागत

मात्र, प्रथमेशच्या कुटुंबीयांनी भाजपचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे प्रतापगडमधील या रंजक लढतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

33 वर्षीय प्रथमेश अनेक वर्षांपासून या भागातील राजकारणात सक्रिय आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संगम लाल गुप्ता यांनी 436291 मते मिळवून ही जागा जिंकली होती. दुसऱ्या क्रमांकावर बसपचे उमेदवार अशोक त्रिपाठी यांना ३१८५३९ मते मिळाली होती. त्यामुळे जागेवर बसपची व्होट बँक मजबूत आहे.

BSP candidate Uttar pradesh Pratapgarh Prathamesh Mishra
Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

प्रथमेश बसपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होत होती. बसपच्या उमेदवारीसाठी अनेकांची नावे चर्चेत होती आणि अखेर प्रथमेशला संधी मिळाली.

तिकीट मिळाल्यानंतर प्रथमेशने आपण आपली राजकीय कारकिर्द सुरू केल्याचे सांगितले. भाजप नेते शिव प्रकाश सांगतात की ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मुलगा बसपकडून निवडणूक लढवत असेल तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com