Sonam Wangchuk
esakal
सोनम वांगचुक यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने मंगळवारी त्यांना सरकारी सफदरजंग रुग्णालयातून खासगी मेडांता रुग्णालयात हलविण्याची परवानगी दिली आहे. सोनम यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी टीप्पणी करत न्यायालयाने वांगचूक यांना शिफ्ट करण्याचे निर्देश दिले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.